physical edu
physical edu 
पुणे

दहावी-बारावीची शारीरिक शिक्षण परीक्षा; राज्य मंडळाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

सकाळवृत्तसेवा

पुणे : इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची परीक्षा घेण्याबाबत राज्य मंडळाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही सत्रात परीक्षा न घेता एकाच सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या नवीन मूल्यमापन आराखड्यानुसार मूल्याकंन करण्यात येणार आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर या परीक्षांचे आयोजन करून १० जूनपर्यंत त्याचे मूल्याकंन संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य व शारिरीक विषयाच्या परीक्षेबाबतही विद्यार्थी-पालक, त्याचबरोबरच शिक्षकांमध्ये संभ्रम होता. या परीक्षा कधी आणि कशाप्रकारे घ्यायच्या, त्यांचे मूल्यांकन कसे करायचे, अशी पेचात शिक्षक होते. राज्यमंडळाकडून तज्ञांमार्फत यु-ट्युबवर प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले होते. प्रशिक्षणादरम्यान प्रश्न विचारण्याची संधी न मिळाल्यानेशिक्षक नाराज होते. परंतु उशरा का होईना ! राज्य मंडळाकडून अखेर याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर या सूचना सविस्तरपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या राज्यातील विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिल्या आहेत. 

दहावीचे असे होईल मूल्यांकन

दहावीसाठी दोन्ही सत्रांत परीक्षा न घेता एकाच म्हणजे द्वितीय सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे. प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या १०० गुणांपैकी प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता लेखन कार्य पूर्व करून घ्यावे लागणार आहे.

बारावीचे असे होईल मूल्यांकन
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेसाठी २५ आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी २५ अशा ५० गुणांची परीक्षा होणार आहे. आरोग्याधिष्ठित, कौशल्याधिष्ठित शारीरिक क्षमतेवर आधारित कोणतीही एक क्षमता, कोणताही एका सांघिक खेळाची निवड करून क्रीडा कौशल्य सादरीकरण करणे, योग व प्राणायाम, दोन आसने विविध क्रीडा स्पर्धातील सहभाग व तासिका उपस्ि ति, पुस्तक लेखन कार्य यावर परीक्षा घ्यावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT