students block the road in Navi Peth in Pune Due to postponement of MPSC examination  
पुणे

MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक; नवी पेठेत रास्ता रोको

सकाळवृत्तसेवा

पुणे : गेल्या वर्षभरापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असताना आता पुन्हा एकदा 14 मार्च रोजी होणारी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पुढे ढकलून विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पुण्यातील नवी पेठ येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको सुरु केले असून ठिय्या आंदोलन केले आहे. 

एमपीएससीने गुरुवारी परिपत्रक काढून राज्यात कोणाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने आता परीक्षा घेणे योग्य नाही असे पत्र पुनर्वसन विभागाने १० मार्चला एमपीएससीला दिले होते. त्यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलली जात आहे असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. दरम्यान वारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.  

भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर नवी पेठे तील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले  आहेत. नवी पेठेत मोठ्या  वाहतूक कोंडी झाली असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आली  आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Match : वैभव सूर्यवंशी कल्ला करणार, तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली वन डे खेळणार; जाणून घ्या सामना कधी, कुठे, किती वाजता Live पाहता येणार

Roti Lasagna Recipe: पोळी उरली की फेकू नका! बनवा भन्नाट ‘रोटी लजानिया’; चवीला एकदम लाजवाब!

Shimron Hetmyer Smashes 37-Ball Hundred : राजस्थान रॉयल्सने रिलीज केले, गडी पेटला! T10 क्रिकेटमध्ये ठोकले शतक, ९ चौकार अन् ८ षटकारांचा पाऊस...

IND vs NZ 1st Test Day 2 Live: रोहित शर्मानंतर क्रिकेट इतिहासात ग्लेन फिलिप्सने 'अविश्वसनीय' पराक्रम केला; शतक ठोकले, निकोल्ससह अनेक विक्रमही मोडले...

IND vs NZ 1st Test Day 2 Live: ग्लेन फिलिप्सच्या मानेवर चेंडू जोरात आदळला! बॅट फेकली, हेल्मेट फेकलं... भारतीय खेळाडूने टशनने पाहिलं; जबरदस्त ड्रामा

SCROLL FOR NEXT