students created water storage in Varoti bdk Friday motivation
students created water storage in Varoti bdk Friday motivation 
पुणे

#FridayMotivation श्रमसंस्कारातून विद्यार्थ्यांनी भागवली गावकऱ्यांची तहान

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : वेल्हे तालुक्‍यातील साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या वरोती बुद्रुक गावात वडगाव बुद्रुक येथील श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दोन बंधारे बांधून उन्हाळ्यातील पाणीप्रश्‍न सोडविला. 

नवले अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वरोती बुद्रुक गावात सात दिवसांचे श्रमसंस्कार शिबिर पार पडले.  विद्यार्थ्यांनी परिश्रमातून व लोकसहभागातून तब्बल 60 हजार व एक लाख लिटर पाणी साचेल असे वनराई पद्धतीचे दोन बंधारे बांधले. या बंधांऱ्यामुळे गावाकऱ्यांना एप्रिल व मे महिन्यात मदत होणार आहे. त्याचबरोबर, येथील पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या झऱ्यापर्यंत मातीचा रस्ता तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गावात एकूण १४ शोषखड्डे तयार केले आहेत. या शोष खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना डासांचा त्रास होणार नाही. महिला सबलीकरण, तंटामुक्त आदर्श गाव, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जागृतीदेखील केली. गावकऱ्यांनी प्रत्येक उपक्रमात सहभाग घेतला. 

राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. शिवाजी पाचारणे, महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. नितीन शेरजे, विवेक चिन्तळ,  ज्ञानप्रबोधिनीचे अजित देशपांडे यांनी शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संजयकुमार पिंगट, प्रा. सहदेव जाधव, प्रा. सागर रणवरे, प्रा. प्रतिभा वाळुंज, प्रा. चित्रा संकपाळ तसेच वरोती बुद्रुक शाळेतील शिक्षकांचे यासाठी सहकार्य लाभले. 

संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले, प्राचार्य डॉ. अरविंद देशपांडे, उपप्राचार्य डॉ. किशोर बोरोले व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुखांमुळे शिबिर यशस्वीरीतीने पूर्ण झाले. शेवटच्या दिवशी महाविद्यालयातील शिक्षकांचा व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT