Ahilya Devi school  sakal
पुणे

उत्तर बरोबर की चूक हे पाहण्याची विद्यार्थ्यांना मिळाली संधी

अहिल्यादेवी प्रशालेचा अभिनव उपक्रम, शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका विद्यार्थिनींच्या हाती

मीनाक्षी गुरव - सकाळ वृत्तसेवा

पुणे : वर्षभर अभ्यास केल्यानंतर होणारी वार्षिक परीक्षा...खरंतर वार्षिक परीक्षा म्हटलं की, विद्यार्थ्यांवर काहीसा ताण हा असतोच. परीक्षा संपली, तरी निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये हुरहूर कायम असतेच. ‘वार्षिक परीक्षेत प्रश्नपत्रिकेनुसार उत्तरपत्रिकेत आपण काय बरं लिहिलं’,‘लिहिलेलं उत्तर बरोबर आहे का!’, ‘उत्तराला बाई किती गुण देतील’, याची उत्सुकता शिगेला पोचलेली असते. विद्यार्थ्यांमधील नेमकी हीच उत्सुकता लक्षात घेऊन शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना पुन्हा वाचायला देण्याचा अभिनव उपक्रम पुण्यातील एका शाळेत सुरू आहे.

शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स या शाळेत हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. वार्षिक परीक्षेत विषयानुसार प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांनुसार विद्यार्थिनींनी उत्तरे कशी लिहिली आहेत, त्याला शिक्षकांनी कसे गुण दिले आहेत, उत्तरे लिहिताना नेमक्या काय चुका झाल्या आहेत, त्या चुका पुन्हा पुढील परीक्षेत टाळाव्यात, तसेच आपण लिहिलेल्या उत्तरांची पद्धत/रचना बरोबर आहे की नाही, लिहिलेल्या उत्तराला किती गुण मिळत आहेत, हे विद्यार्थिनींना कळावे, या उद्देशाने शाळेत दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.

‘‘दरवर्षी वार्षिक परीक्षा झाल्यानंतर विषयानुसार शिक्षक विद्यार्थिनींच्या उत्तरपत्रिका तपासतात. त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने विद्यार्थिनींना पुन्हा वर्गात बोलावून त्यांना शिक्षकांनी तपासलेल्या उत्तर पत्रिका दाखविण्यात येतात. उत्तरे लिहिताना काय चुकले आहे, उत्तर कसे लिहिणे अपेक्षित आहे, हे विषय शिक्षक विद्यार्थिनींना समजावून सांगतात,’’ असे शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा डांगे यांनी सांगितले.

तपासलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा विद्यार्थिनींना दिल्याने हे होतंय साध्य:

  • उत्तरे लिहिताना होणाऱ्या चुका विद्यार्थिनींना समजतात

  • प्रश्नांनुसार योग्य पद्धतीने उत्तरे कशी लिहावीत हे कळते.

  • इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना दहावीच्या परीक्षेत उत्तरे कशी लिहिणे अपेक्षित आहे, याचे मार्गदर्शन मिळते

  • विद्यार्थिनींना स्वत:चे मूल्यमापन करणे शक्य होते

  • चांगले गुण मिळविण्यासाठी कशा पद्धतीने उत्तरांची मांडणी असावी, हे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SA 1st Test: बाबर आझमचा अम्पायरने 'करेक्ट कार्यक्रम' केला! पाकिस्तानी चाहते खवळले; १० फलंदाज १६७ धावांत तंबूत परतले

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; फडणवीस सरकारने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय

Weight Gain Foods: तुमचं वजन वाढवायचंय का? मग आहारात 'या' पदार्थांचा नक्की समावेश करा!

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Latest Marathi News Live Update: सोलापुरात पत्नीचा पतीकडून खून; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT