pune university 
पुणे

बनावट गुणपत्रिकाप्रकरणी चार विद्यार्थ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - एमबीए प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्या परीक्षेची बनावट गुणपत्रिका सादर करून झारखंड व बिहारमधील चार विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रवेश घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. संबंधित विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अपराजिता राज (रा. बिस्तुपूर कालीमाली, जमशेदपूर, झारखंड), भोमिरा (रा. मानपुर, बिहार), दिव्या सिंग (रा. ग्लोमोरी सिगबम, झारखंड) आणि शैलेश कुमार सिंग (रा. जमशेदपूर, झारखंड) अशी या चौघांची नावे आहेत. या प्रकरणी डॉ. सुरभी प्रवीण जैन यांनी विद्यापीठातर्फे फिर्याद दिली आहे. डॉ. जैन या व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. 

आरोपींनी एमबीएला प्रवेश घेण्यासाठी एटीएमए (एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ॲडमिशन्स) संस्थेची बनावट गुणपत्रिका सादर केली. त्याआधारे त्यांनी २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षासाठी एमबीएसाठी प्रवेश घेतला. प्रवेश प्रक्रियेनंतर गुणपत्रिकांची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाकडून त्या एटीएमएकडे पाठविण्यात आल्या. तेव्हा या गुणपत्रिका बनावट असल्याची माहिती देण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ‘माझी टिंगल करा, मला वाईट वाटणार नाही’; जरांगेंच्या टीकेला बावनकुळेंचा सडेतोड पलटवार, एकही दाखला रद्द केलेला नाही

Shirur Kasar Loan Waiver: चार हजार ५२१ शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग झाला मोकळा; शिरूर कासार; कर्जमुक्तीची पहिल्या टप्प्याची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

Beed Water Shortage:आष्टी शहरासाठी १९ टँकरच्या खेपा; आष्टीकरांचे डोळे आकाशाकडे; १५ ते २० दिवसांनी मिळतंय पाणी

Marathi News Live Updates : डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी RSS वर बंदी घालून दाखवावी; भाजप प्रदेशाध्यक्षांचं ऑपन चॅलेंज

August 2026 Horoscope: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा अन् उत्पन्नाचे नवे मार्ग; ऑगस्टमध्ये ‘या’ ४ राशींचे दिवस बदलणार

SCROLL FOR NEXT