Pune_University_Students 
पुणे

'अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय...'; सरकारच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवर सरकारने सर्व विद्यार्थ्यांना एकच नियम लावायला पाहिजे होता. सरकारने घेतलेला निर्णय गुंतागुंतीचा आणि विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडणारा आहे, अशी टीका विद्यार्थी तसेच विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तर काही विद्यार्थ्यांनी, शिक्षण तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

गेल्या एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेचा वाद सुरू होता. त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता.१९) अखेर निर्णय जाहीर केला. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 

अभिनंदन झोरे म्हणाला, "राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य राहणार नाही, तसेच परीक्षा दिली तरी त्याचा निकाल लागण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे परीक्षा देणार नाही. 

"परीक्षा रद्द केल्या असल्या तरी मी परीक्षा देणार नाही हे लिहून द्यायचे आहे, त्याचा आमच्या भविष्यावर वाईट परिणाम होणार का अशी शंका निर्माण झाली आहे. सरकारने असा दुजाभाव करण्यापेक्षा एकच नियम सर्वांसाठी असला पाहिजे, तसेच बॅकलाॅक असलेल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी मागणी शिल्पा साळवे या विद्यार्थिनीने केली. 

महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे म्हणाले, "सरकारने घेतलेला निर्णय गुंतागुंतीचा आणि विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडणारा आहे. तसेच समान न्यायाच्या तत्वांशी विसंगत आहे. सरकारला जर थेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जड जात असेल, तर आम्ही विद्यार्थीहितार्थ हा तिढा सोडवण्यास आपल्याला मदत करू."

हास्यास्पद निर्णय
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका करत हा निर्णय आश्यर्यकारक नसून हास्यास्पद आहे. ज्याला परीक्षा द्यायची आहे त्याने परीक्षा द्यावी, ज्याला पदवी हवी आहे त्याने पदवी घ्यावी. यातून बाजार मांडून ठेवल्याचे दिसते. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निर्णय केंद्रीय समितीवर ढकलून स्वतःची जबाबदारी झटकून दिली आहे. हा पळकुटेपणा आहे, अशी टीका अभाविपचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विद्यापीठांपुढे आव्हान
शिक्षण तज्ज्ञ डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, "राज्य सरकारने कायद्याच्या चौकटीत परीक्षेचा निर्णय कसा बसेल याचा विचार केला आहे. आता याच्या अंमलबजावणीचे आव्हान महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या समोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

SCROLL FOR NEXT