pune sakal
पुणे

Pune News : आसामच्या विद्यार्थ्यांचे पुणे विद्यापीठात जल्लोषात स्वागत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘युवा संगम’ सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत आसाममधून आलेल्या ५० विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात ‘युवा संगम’ सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत आसाममधून आलेल्या ५० विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात झालेल्या ‘युवा संगम’ कार्यक्रमात या आसामी पाहुण्यांनी अस्सल मराठमोळ्या संस्कृतीची झलक अनुभवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियानांतर्गत यंदा ‘युवा संगम’ उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन देशभरात केले जात आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांमधील निवडक विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत राज्यभेटींचे आयोजन केले आहे. त्यासाठी आसाममधील विद्यार्थ्यांचा संघ रविवारी पुण्यात दाखल झाला. पुणे विद्यापीठाने या उपक्रमांतर्गत आलेल्या आसामी विद्यार्थ्यांचे विद्यापीठात जल्लोषात आणि मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका विशेष समारंभामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या बागेश्री मंठाळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संदीप पालवे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT