Students stuck in Pune are finally allowed to return by private bus 
पुणे

अखेर अडीच महिन्यांनी प्रतिक्षा संपली; पुण्यात अडकेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : अडीच महिन्यांची प्रतीक्षा संपली आहे. आता घर आणि नातेवाइकांच्या मायेची उब मिळेल. मनात आनंद दाटून राहिलाय. आम्हाला गावी नेण्याचा निर्णय उशिरा झाला. पण आता झाला आहे, याचे समाधान आहे...पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांची ही भावना आहे. शहरात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर या तरुण तरुणींना घरची ओढ लागली होती. पण लॉकडाऊनमुळे ते  अडकून पडलेले होते. प्रशासनाकडे ते वारंवार मागणी करीत होते. अखेर त्यांना खासगी बसने परतण्याची परवानगी त्यांना मिळाली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वारगेट बस स्थानकातून हे तरुण-तरुण आणि काही कामगार त्यांच्या गावी परतणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास पाच बसमधून काही जण बीड, उस्मानाबादच्या दिशेने रवाना झाले, तर रात्री आठच्या सुमारात विदर्भातील काही जिल्ह्यांच्या दिशेने अकरा बस निघतील. या बसमधून साडे तीनशे लोक त्यांच्या गावाकडे रवाना होतील. घरी जायला मिळत असल्याने हे सर्वजण आनंदात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील असलेला बालाजी माळी म्हणाला, "आम्ही घरी परततोय याचा जास्त आनंद आमच्या कुटुंबीयांना आहे. बऱ्याच दिवसानंतर आम्ही गावाकडे जात आहेत. तेथे आमचे विलगीकरण होईल. नंतरच आम्हाला कुटुंबात जाता येईल. पण किमान गावाकडे असल्याचे समाधान असेल." बार्शी तालुक्यातील संजीवनी पोटघरे म्हणते, "गेली अडीच महिने आम्ही घरी परतण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण आता परवानगी मिळाली. त्रास सहन केल्यानंतरच चांगल्या गोष्टी घडतात, तसेच झाले आहे. आम्ही परतणार असल्याने घरचे लोक खूप खूष आहेत."

कोरोनाच्या लढाईत घटले आयुक्त शेखर गायकवाड यांचे वजन

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गावी परतता यावे म्हणून प्रयत्न करणारा महेश बडे म्हणाला, "सरकाराने योग्य निर्णय घेतला आहे. वैद्यकीय चाचण्या करून तीनेशहून अधिक लोक गावी परतत आहेत. प्रवासादरम्यान जेवण पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतीक्षा संपून प्रत्येकजण आनंदाने घरी परतत आहे."

विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

SCROLL FOR NEXT