पुणे

घोरावडेश्वर डोंगर हिरवाईने बहरला; २०२ वृक्षांची यशस्वी ‘जोपासना’

CD

सोमाटणे, ता. ३१ ः आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घोरावडेश्वर डोंगरावर पाच वर्षांपूर्वी लावलेल्या सर्व २०२ वृक्षांचे संगोपन करण्यात यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आणि देवस्थानच्या सहकार्याने ओसाड माळरानावर करण्यात आलेली वृक्षलागवड आता हिरवाईने बहरली आहे.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १७ फेब्रुवारी २०२१ रोजी पहिल्या टप्प्यात घोरावडेश्वर मंदिर परिसरातील पुजारी व भक्तनिवासाजवळील माळरानावर अंजन, रुद्राक्ष व बेलवन या जातींचे १०१ वृक्ष लावले होते. त्यानंतर ७ मार्च २०२१ रोजी दुसऱ्या टप्प्यात देवचाफा जातीचे आणखी १०१ वृक्ष लावण्यात आले.
वृक्षलागवडीनंतर त्यांचे संरक्षण व्हावे, तसेच उन्हाळ्यात नियमित पाणी मिळावे, यासाठी देवस्थान व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जाळीचे कुंपण आणि ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली. नजीकच्या काळात देवस्थानच्या वतीने अमरनाथ बाबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वृक्षांची नियमित देखभाल केली. त्यामुळे सर्व २०२ वृक्ष जगले असून, त्यांची वाढही चांगली झाली आहे. सध्या या वृक्षांची उंची आठ ते दहा फुटांपेक्षा अधिक झाली आहे. सर्वच्या सर्व वृक्ष जगवण्यात यश आल्याने काही वर्षांपूर्वी उजाड दिसणारे माळरान आता हिरव्यागार वृक्षांनी बहरले आहे.

PNE26W46075
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Price Hike: 'कटिंग' ला महागाईचा कट! साखर, दूध, गॅस, चहाच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीची शक्यता

Amit Thackeray Pune Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी हा फोटो नको’; अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला लावला अन्...

New Rule: 1 सप्टेंबरपासून खिशावर मोठा परिणाम! LPG, दूध, ITRसह 5 नियम बदलणार; जाणून घ्या काय स्वस्त-महाग होणार

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदींचा फोटो काढल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे - नवनाथ बन

Fake Degree Racket: बनावट पदवी रॅकेटचा तपास वेगात; आरोपीच्या नागपुरातील घरावर छापा; लॅपटॉप, कलर प्रिंटर जप्त

SCROLL FOR NEXT