पुणे

आहुपे आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना सायकल भेट

CD

फुलवडे, ता. २७ ः आहुपे (ता. आंबेगाव) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील ६ विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभाग आयोजित अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉलमध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुरेश हुले यांनी स्वखर्चातून या ६ विद्यार्थ्यांना ७७व्या प्रजासत्ताक दिनी सायकली भेट दिल्या.
प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात, घोषणा देत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पंचशील मंडळ तसेच आश्रमशाळेत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. संगीत कवायत व बालसभेत विद्यार्थ्यांनी भाषण केले. विविध कला व क्रीडा प्रकारातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक हुले यांच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT