पुणे

विद्यार्थ्यांना घरात राहून स्वयंअभ्यास करणे शक्‍य होणार आहे

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे - शाळेतील नियमित तासांप्रमाणे घरी बसूनही अभ्यास करता यावा, यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीला आता शैक्षणिक दिनदर्शिका असणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना विषयानुसार पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठाचा घरात राहून, स्वयंअभ्यास करणे शक्‍य होणार आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा नियमितपणे शाळा सुरू करणे शक्‍य झाले नाही. म्हणून राज्य सरकारने डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर परिषदेने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

त्याचा वापर शिक्षक, पालकांनी अत्यंत विचारपूर्वक करून, विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक समृद्ध करणे आवश्‍यक असल्याची माहिती परिषदेतर्फे देण्यात आली. प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थी या दिनदर्शिकेचा वापर करून आपल्या सवडीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण घेऊ शकणार आहे. 

ही शैक्षणिक दिनदर्शिका जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत पाठ्यपुस्तकातील पाठांनुसार अभ्यास कसा करावा, असे सांगणारी आहे. ही दिनदर्शिका पीडीएफ स्वरूपात परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे; परंतु ती विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वापरायची असल्याची सूचना परिषदेतर्फे देण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विद्यार्थी-पालक यांच्यासाठी सूचना 
- दिनदर्शिका म्हणजे पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित नियोजन 
- अध्ययन करताना पाठ्यपुस्तकांचा उपयोग करावा 
- एक पाठ संपल्यानंतर त्यावरील स्वाध्याय पूर्ण करावा 
- दररोज प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची सवय लावून घ्या 
- ठराविक कालावधीनंतर शिक्षकांनी पाठविलेल्या चाचण्याही सोडवाव्यात 
- ई-साहित्य सलगपणे न पाहता प्रत्येक विषय संपल्यानंतर थोडी विश्रांती घ्या 

शिक्षकांसाठी सूचना 
- ही दिनदर्शिका आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी 
- अभ्यास कसा करावा, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा 
- पाठ शिकताना पाठ्यपुस्तकांचा वापर कसा करायचा, याबद्दल शिक्षकांनी सूचना द्याव्यात 
- ई-साहित्य संबंधित समांतर उपक्रम आणि स्वाध्याय याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधावा 
- प्रत्येक पाठाचे ई-साहित्य बघण्यापूर्वी आणि बघितल्यानंतर काय करावे, याबद्दल विद्यार्थ्यांना सांगावे 

कोरोनामुळे शाळा बंद असल्या, तरी शिक्षण थांबू नये, यासाठी पाठ्यपुस्तकांच्या साह्याने विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास करण्यास साहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पूरक शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे. ही दिनदर्शिका "*http://bit.ly/2YTrzj5" या लिंकवर उपलब्ध असून, प्रत्येक इयत्तेनुसार ती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येणार आहे. 
- विकास गरड, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT