Students will get new hostel in Pune University 
पुणे

पुणे विद्यापीठात विद्यार्थीनींना मिळणार नवे हाॅस्टेल 

ब्रिजमोहन पाटील

पुणे : तीन वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे काम अखेर टप्प्यात आले आहे. २०० विद्यार्थीनींना अद्ययावत सेवा असलेले असलेले वसतिगृह या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होणार आहे. 

पुणे विद्यापीठात महाराष्ट्रासह देशभरातून परदेशातून विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. पुण्यात बाहेर काॅट बेसिस किंवा शेअरींगमध्ये फ्लॅट घेतला तरी महिन्याला कमीत कमी ३ हजार रुपये खर्च आहे. मात्र, विद्यापीठात एका वर्षाचे शुल्क ६ हजारापेक्षा कमी आहे. आर्थिक दृष्ट्या व सुरक्षेच्या दृष्टीनेही हे वसतिगृह महत्त्वाचे ठरतात त्यामुळे यातील सर्वच मुलींना विद्यापीठाचे वसतिगृह उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा पालकांची असते. अनेकदा वसतीगृह उपलब्ध होत नसल्याने प्रवेश रद्द करण्याची नामुष्की वाढते. डॉ. वासुदेव गाडे हे कुलगुरू असताना १३ फेब्रुवारी २०१७ रोजी नवीन वसतिगृहाचे भूमिपूजन केले होते. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगा'ने ५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या वसतिगृहाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अधिसभेत  सदस्यांनी धारेवर धरले होते. त्यानंतर कामाची गती वाढविण्यात आली. अखेर याचे काम पूर्णत्वास आले आहे. 

सध्या अस्तित्वास असलेल्या विद्यापीठातील मुलींच्या वसतिृहाच्या पाठीमागे ही पाच मजली इमारत आहे. यात जवळपास ५० खोल्या आणि २०० मुलींना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. वसतिगृहाच्या इमारतीचे काम अंतीम टप्प्यात असून, नोव्हेंबर पर्यंत ही  इमारत विद्यार्थिनींसाठी उपलब्ध असणार आहे.

मुला मुलींची क्षमता समसमान 
सध्या विद्यापीठात मुला मुलींचे प्रत्येकी ९ वसतीगृह आहेत. पण मुलींची क्षमता मुलांपेक्षा २०० ने कमी आहे. मुलींसाठी १० वे वसतीगृह तयार झाल्याने आता मुलींसाठीही वसतीगृह क्षमता १ हजार ७५० एवढी झाली आहे. 

"मुलींसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचे काम पूर्ण झाले. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी मुलींना हे या वसतिगृहात प्रवेश दिले जातील. विद्यापीठात विद्यार्थिंनीना निवासाची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे."- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ

"पुणे विद्यापीठात वसतीगृह मिळाले की उच्च शिक्षण घेण्याची संधी वाढते. काही मुली वसतीगृह मिळत नाही म्हणून प्रवेश रद्द करतात. अनेक वर्ष नव्चा वसतीगृहाचे काम सुरू होते, ते पूर्ण होत असेल तर आम्हाला नक्कीच फायदा होईल. - विद्यार्थीनी, एमएससी, पुणे विद्यापीठ

- चार मजली इमारत, एका मजल्यावर १२ खोल्या
- २०० मुलींची क्षमता
- प्रत्येक मजल्यावर छोटे किचन आणि कपडे धुण्यासाठीची जागा
- एका खोलीत तीन विद्यार्थीनी
- काॅट, लाॅकर, टेबल, खुर्चीची व्यवस्था


सध्याची स्थिती 

  • मुलींच्या वसतीगृहाची संख्या - ९ 
  • क्षमता - १५५० 
  • मुलांची वसतीगृहाची संख्या - ९ 
  • क्षमता -१७५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT