पुणे

सुभाष चंद्र यांच्यावर गुन्हा

CD

हेड
सुभाष चंद्र यांच्यावर गुन्हा

सबहेड
फसवणूकप्रकरणी ‘सीबीआय’ची कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.५ ः गृहवित्त क्षेत्रातील कंपनी ‘एलआयसी हाउसिंग फायनान्स’ची १ हजार ३२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी झी समुहाचे संस्थापक सुभाष चंद्र यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी चंद्र यांच्याशी संबंधित २२ हजार कोटी रुपयांच्या दाव्याचे सेटलमेंट केवळ ६.२५ कोटी रुपयांत करण्यास आक्षेप घेण्यात आला होता. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या दोन सदस्यीय पीठाने दिलेल्या आदेशांना नंतर स्थगिती मिळाली होती त्यानंतर हे प्रकरण पाच सदस्यांच्या मोठ्या पीठाकडे वर्ग करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘सीबीआय’ने हा गुन्हा दाखल केला आहे. ‘पैशाची परतफेड करण्याच्या मुद्द्यावर स्पष्टता दिसून येत नाही. अशा स्थितीत सुभाष चंद्र यांनी त्यांची संपत्ती इतरत्र कुठेही वळवू नये,’ असे सांगत ‘एनसीएलएटी’ने चंद्र यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. चंद्र यांच्याशी संबंधित कंपन्यांनी बँका आणि वित्त संस्थांकडून २०१८ पासून कर्ज उचलले होते.

अडचणी वाढल्या
- हे  कर्ज घेताना चंद्र यांनी  त्यांच्या सर्व मालमत्तांचे मूल्य ५९ हजार ११३ कोटी रुपये असल्याचे सांगत तसे प्रमाणपत्र दिले होते. मात्र २०१४ मध्ये त्यांनी आपल्याकडे केवळ ३१.७९ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा केला होता. वैयक्तिक दिवाळखोरीच्या प्रकरणात  ‘एनसीएलएटी’ने दणका दिलेला असतानाच  ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केल्यामुळे चंद्र यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.


आक्षेप काय?
- एस्सेल समुहाशी संबंधित कंपन्यांच्या २२ हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी देण्यात आलेली वैयक्तिक हमी सेटलमेंट केवळ ६.२५ कोटी रुपयांमध्ये करण्यास एलआयसी हाउसिंग फायनान्स आणि कॅनरा बॅंकेने आक्षेप घेतला होता.

- विशेष म्हणजे दहा बॅंका आणि वित्तसंस्थांनी सेटलमेंटच्या बाजूने कौल दिला होता. कर्जाच्या रकमेच्या तुलनेत सेटलमेंटची रक्कम खूप कमी असल्याचे ‘एलआयसी हाउसिंग’ने म्हटले होते. असहमती असलेल्या कर्जदारांची मताधिकाराची टक्केवारी वीस टक्क्यांपेक्षा कमी होती.


चंद्र यांची भूमिका
२२ हजार कोटी रुपयांचे कर्ज हे आपण स्वत: घेतले नव्हते. वैयक्तिक हमीची रक्कम ही ३ हजार ९९०
कोटी रुपयांची होती. मोठ्या प्रमाणावरील कर्जाची रक्कम ही संबंधित कंपन्यांशी संबंधित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात NIA कोर्टाने १० आरोपींना ठरवलं दोषी; छत्तीसगड काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचं हत्याकांड प्रकरण

Vaibhav Sooryavanshi कमी होता, त्यात आणखी एकाची भर पडली! २० वर्षीय टीममेटचा कहर, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

Pune indigenous defence tech: पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञांचा स्वदेशी स्टार्टअप; मानवरहित ड्रोन, स्वायत्त बोटींद्वारे जलसुरक्षेत क्रांती

Marathi News Live Updates: पंतप्रधानांचा फोटो काढल्याप्रकरणी मनसेचे आशिष साबळे प्रशांत कनोजिया, विक्रांत कनोजियांना जामीन मंजूर

Blood Pressure: हाय बीपीवर फक्त मीठ कमी करण्याचा उपाय पुरेसा नाही; पोटॅशियम वाढवणेही गरजेचे! संशोधनातून नवा खुलासा...

SCROLL FOR NEXT