Pune News  esakal
पुणे

Pune News : शेतकरी उत्पादक संघ व कंपन्यांना गोदाम बांधकामस अनुदान

31 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्याचे कृषी खात्याचे आवाहन

डी. के वळसे पाटील

मंचर : अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत अनुदानावर गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येणार असून इच्छुक शेतकरी उत्पादक संघ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ता.३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याकरिता २५० मे. टन गोदाम बांधकामासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्यासाठी २ व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत गळीतधान्यासाठी एका गोदाम बांधकामाचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त आहे. यासाठी प्रत्यक्ष झालेल्या बांधकामाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपये यापैकी कमी असलेली अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

ही योजना बँक कर्जाशी निगडीत असल्याने अर्जदारांनी प्रस्ताव सादर करताना केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी, संघ या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करताना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझाइन्स, तपशील व खर्चाच्या अंदाजपत्रकासह अर्ज सादर करावेत. शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी अर्जासोबत सभासद यादी, मागील वर्षीचे ऑडीट रिपोर्ट व ७/१२, ८ अ उतारा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर ॲग्रोटेक शेतकरी कंपनीचे उपाध्यक्ष दिनेश खुडे व संचालक अशोक शिंदे यांनी राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले"पुणे जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी यापूर्वीच गोदाम बांधकामासाठी अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी शासनाकडे वेळोवेळी केली होती. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी गेल्या आठवड्यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांचे शिष्टमंडळ भेटले होते. शेतकरी कंपन्यांसाठी कृषी विभागाची ही योजना उपयुक्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT