Heart Sakal
पुणे

Heart Attack : हृदयविकाराचा झटका आलेल्या दहा वारकऱ्यांचे प्राण वाचविण्यात यश

विठूरायाच्या भेटीसाठी ‘भेटी लागे जिवा...’ म्हणत पंढरीकडे चाललेल्या वारकऱ्यांपैकी दहाजणांना हृदयविकाराचा झटका आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं पावयाचा नाही रं...’ संत तुकडोजी महाराजांनी भक्तांना सावध करण्यासाठी लिहिलेले हे गाणं. मनात जर देवा प्रती भाव असेल तर देव पावणारच, असे तुकडोजी महाराजांनी सांगून ठेवलं आहे. याची प्रचिती काही वारकऱ्यांना यंदाच्या वारीत आली. विठूरायाच्या भेटीसाठी ‘भेटी लागे जिवा...’ म्हणत पंढरीकडे चाललेल्या वारकऱ्यांपैकी दहाजणांना हृदयविकाराचा झटका आला.

पण ‘आरोग्य वारी’मुळे त्यांचे प्राण वाचले अन् ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा...’ असे म्हणत त्यांचे हात आपोआप जोडले गेले. या वर्षी प्रत्येक पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रथमच अद्ययावत अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे या वारकऱ्यांना वेळेत उपचार मिळाले.

राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाने या वर्षी वारीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. आतापर्यंत औषधे, विविध रोगांबद्दल जनजागृती, आरोग्याची वारी अशा उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य खाते वारीमध्ये सहभागी होत असे.

या वर्षी प्रथमच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध पालख्यांच्या मुक्कामी अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध होती. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि औषधे उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचार करता आले.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे रुग्णांना दाखल करून उपचारासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध केली होती. त्यामुळे वारीच्या वाटेवर असताना सुमारे तीन हजार रुग्णांवर उपचार करता आले.

त्यात दहा हृदयविकार आलेल्या रुग्णांचा समावेश होता. त्यांना त्रास होऊ लागताच पहिल्या तासाभरात अचूक निदान करून प्रभावी उपचार करण्यात यश आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले. तसेच पंढरपूरमध्ये गोपाळपूर, तीन रस्ता आणि वाखरी येथे रुग्णांच्या उपचाराची सुविधा उभारली होती. तेथे सुमारे ९५० रुग्णांना दाखल करून उपचार करता आले.’

अशी झाली सेवा

आजार तपासलेले रुग्ण

ताप - १८,३४८

तार, सर्दी, खोकला - ९,१८२

अतिसार - ५,७३९

अमांश - १,९८३

श्वान दंश - ३८३

श्वसनाचे विकार - २६६

रस्ता अपघात - ९६

हृदयविकार - १०

सर्प दंश - ५

पंढरपूरमध्ये कान, नाक, घसा (ईएनटी), नेत्रतज्ज्ञ, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, फिजिओथेरपी, हृदयरोगासह शस्त्रक्रियेपर्यंतच्या सर्व विशेषज्ज्ञ सेवा उपलब्ध केल्या होत्या. तसेच बाइक अँब्ल्युलन्स, १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे वारीच्या वाटेवर असलेल्या प्रत्येक वारकऱ्याला अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळतील, याची काटेकोर काळजी घेण्यात आली होती.

- डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, पुणे परिमंडळ, सार्वजनिक आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : आकिब नबीने विश्वास सार्थ ठरवला... किवींना ११ धावांत २ धक्के; KL Rahul चा अविश्वसनीय झेल Video Viral

Bala Nandgaonkar: विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा; बाळा नांदगावकर; पिंगुळी पाझर तलाव, सासोली जमीन घोटाळाप्रश्‍नी आक्रमक

Pune Markets: दिवाळीनिमित्त व्यापारी पेठा गजबजल्या ;नवीन खतावण्यांची खरेदी; विविध दुकानांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; सकाळी १० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार

Amba Ghat Tunnel Project : आंबा घाटाला मिळणार बोगद्याचा पर्याय! कागल ते रत्नागिरी प्रवास आता अवघ्या एका तासात; प्रकल्प अहवाल तयार करण्याची मंत्री गडकरींकडून सूचना

SCROLL FOR NEXT