पुणे

राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्काराने "यशस्वी' संस्था सन्मानित 

सकाळवृत्तसेवा

पुणे : केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्काराने पुण्यातील "यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स' या संस्थेला गौरविण्यात आले आहे. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ.महेंद्र नाथ पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा दूरदृष्य ऑनलाईन प्रणालीदारे संपन्न झाला. अप्रेंटीस योजनेच्या अंमलबजावणीत राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

यावेळी डॉ. पांडे म्हणाले, देशाच्या विकासात कौशल्य प्रशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व असून कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या योगदानामुळे युवापिढी कुशल मनुष्यबळ म्हणून तयार होत आहे. ज्यामुळे उद्योगजगताच्या प्रगतीला वेग मिळत असून उद्योगजगतामधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीही चालना मिळत आहे.

आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी कौशल्य विकासाची कास धरली पाहिजे.'' तर हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल "यशस्वी' संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी म्हणाले,""अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून कामाचा अनुभव नाही. या दृष्टचक्रात अडकलेल्या युवकांना अप्रेन्टिस योजनेमुळे प्रत्यक्ष कंपनीत प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध होत असल्याने युवक रोजगारक्षम होत आहेत.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटनही यावेळी डॉ. पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यमंत्री राज कुमार सिंग, सचिव प्रविण कुमार, महासंचालक नीलम राव आदी उपस्थित होते.

(Edited By - Kalyan Bhalerao)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शेतकऱ्याचा शेतातच आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT