Successful Surgery of new born baby at baramati city pune
Successful Surgery of new born baby at baramati city pune 
पुणे

बारामती : काही तासांपूर्वीच जन्मलेल्या बाळाला दुसऱ्यांदा जीवनदान! (व्हिडिओ)

मिलिंद संगई

बारामती शहर : जन्म झाल्यानंतर चार तासातच आपल्या बाळाचे शरीर नीट काम करत नाही हे पाहिल्यानंतर जन्मदात्याची चिंता वाढली, जेजुरीमध्ये जन्माला आलेल्या मुलाला घेऊन पित्याने बारामती गाठली. येथे बाळाच्या आतड्यात दोष असल्याचे निष्पन्न झाले, त्वरित शस्त्रक्रियेचा निर्णय झाला. काही तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाला शस्त्रक्रियेसाठी देताना पित्याचे हात थरथरत होते, मात्र मन घट्ट करत त्यांनी परवानगी दिली आणि मृत्यूच्या दारात गेलेल्या या एक दिवसाच्या बाळाला जीवदान मिळाले.

बारामतीतील डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा यांच्या श्रीपाल हॉस्पिटलमध्ये घडलेला हा किस्सा एखाद्या कथेत शोभावा असाच. जेजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मलेल्या माया दोरगे यांच्या मुलाला हिरव्या उलट्या होत असल्याचे लक्षात आल्यावर तेथील डॉक्टरांनी तातडीने बाळाला बारामतीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. डॉ. मुथा पितापुत्रांनी तपासणी केल्यावर छोट्या आतड्यची पुरेशी वाढ नसल्याने अडचण असल्याचे स्पष्ट झाले. 

तातडीने शस्त्रक्रीया केली नाही तर बाळ जगण्याची शक्यता धूसर होती. सर्जन डॉ. नितीन पळसे, भूलतज्ज्ञ डॉ. अमर पवार, डॉ. राजेंद्र व डॉ. सौरभ मुथा यांच्या टीमने तातडीने या बाळाची अवघ़ड शस्त्रक्रिया केली. एक दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रीया म्हणजे कमालीचा धोका होता, पण तो पालकांसह डॉक्टरांनीही पत्करला आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 

या बाळाला नवसंजीवनी मिळाली, आज पंधरवड्यानंतर हे बाळ इतर मुलांसारखे नियमित जीवन जगत आहे. या बाळाच्या जीवदानानंतर त्याची आई, वडील आणि आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT