पिंपळेगुरव - महापालिकेच्या वतीने ग्रेड सेपरेटर करण्यात येणारा नाशिक फाटा ते कोकणे चौक या मार्गावरील सुरदर्शन चौक. 
पुणे

सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी - सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर (समतल विलगक) करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्यामुळे तेथील वाहतूक कोंडीची समस्या संपेल, तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्यांनाही येथून वेगाने मार्गस्थ होता येईल. नाशिकफाटा ते वाकड या बीआरटी मार्गावरील या प्रकल्पासाठी २७ कोटी रुपये खर्च होणार असून, दोन वर्षांत तो पूर्ण करण्यात येणार आहे.

पिंपळे गुरवमध्ये नाशिकफाटा ते कोकणे चौक यांना जोडणाऱ्या या रस्त्यावरून बीआरटी मार्ग सुरू आहे. आयटी पार्ककडे जाणाऱ्यांसाठी या मार्गावर वातानुकूलित बीआरटी गाड्या सुरू करण्याचे महापालिकेने नियोजन आहे. या महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्याच्या व वेगाने वाहतूक सुरू ठेवण्याच्या उद्देशाने सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर करण्याचे ठरविण्यात आले. 

ग्रेड सेपरेटरमध्ये बीआरटीसाठी दोन लेन असून, त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन गाड्या जाऊ शकतील. ग्रेड सेपरेटरच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंती असून, त्यालगत सेवा रस्ता व पदपथ आहेत. त्या ठिकाणीच सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करण्यात येईल. त्यामुळे या मार्गावरून एकाच वेळी दहा वाहने जाऊ शकतील.

स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘स्थायी समितीने या कामाची निविदा नुकतीच मंजूर केली. महापालिकेने या कामासाठी ३५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता एप्रिलमध्ये घेतली असून, यंदाच्या अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामामुळे बीआरटी सेवा अधिक वेगवान होईल. तसेच हा चौक वाहतुकीसाठी सिग्नल फ्री होईल.’’

या चौकात सध्या वाहनांच्या लांब रांगा लागतात. ग्रेड सेपरेटर झाल्यानंतर तेथून वाहनांना आयटी पार्कच्या दिशेने थेट ये - जा करता येईल. स्थानिक नागरिकांनाही सेवा रस्त्याचा वापर करता येणार असल्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. दोन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करणार आहोत.
- प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Maharashtra Monsoon Prediction : नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेले संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप भारतात परतले

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

SCROLL FOR NEXT