सुधीर दामले Sakal
पुणे

'नाट्यदर्पणकार' सुधीर दामले यांचे निधन

त्यांनी १९७५ साली गणेश सोळंकी यांच्या सल्ल्याने आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने नाट्यदर्पण पुरस्कार सुरू केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठी नाट्यसृष्टीत 'नाट्यदर्पण पुरस्कार' (Natyadarpan Award) सुरू करणारे नाट्यदर्पण प्रतिष्ठानचे संस्थापक सुधीर श्रीकृष्ण दामले (Sudhir Damle) यांचे शनिवारी (ता. ८) रोजी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी १९७५ साली गणेश सोळंकी यांच्या सल्ल्याने आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने नाट्यदर्पण पुरस्कार सुरू केले. ते वितरीत करण्यासाठी 'नाट्यदर्पण रजनी'चे आयोजन ते करत.

मराठी नाट्यसृष्टीमध्ये या पुरस्काराचे महत्त्व वादातीत होते. नाट्यसंगीत आणि चित्रपट सृष्टीतील कलाकार या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावत. २५ वर्षे सातत्याने या रजनीचे गारुड संपूर्ण नाट्यसृष्टीवर होते. रसिकांच्या मनांमध्ये हे प्रेम आणि औत्सुक्य शिखरावर आहे, अशा वेळीच १९९९ साली २५ वी नाट्यदर्पण रजनी झाल्यावर या उपक्रमाची त्यांनी सांगता केली.

या पुरस्कार सोहळ्याच्या बरोबरीने 'नाट्यदर्पण विशेषांक' आणि 'कल्पना एक -आविष्कार अनेक' ही लोकप्रिय एकांकिका आणि उपक्रम नाट्यदर्पण प्रतिष्ठानतर्फे २० वर्षे त्यांनी चालविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Latest Marathi News Live Update : एलपीजी संकटाने गुजरातमधील स्थलांतरित मजूर बिहारमधील आपल्या गावी परतले

Solapur Crime: दागिन्यांच्या लोभातून बार्शीत महिलेचा खून; शहरातून पाच-सहा दिवसांपासून बेपत्ता,धक्कादायक कारण आलं समाेर!

Pune Rain News: पावसाने झोडपले; पुणेकर कोंडीत अडकले, मेघगर्जना, विजांचा कडकडाट; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल; मदतीसाठी तासभरा ५० फाेन!

Shaktipith Highway Route Map : शक्तिपीठ महामार्गाच्या बदलेल्या मार्गात ८ जिल्ह्यांचा नवा नकाशा, लांबी वाढणार, कोकणाचं निसर्ग सौंदर्य संपणार

SCROLL FOR NEXT