Sudhir Mungantiwar statement Baramati best for agriculture education But Chandrapur is better farmer sakal
पुणे

Sudhir Mungantiwar : बारामती शेती,शिक्षणात भारीच; परंतु त्यापेक्षा चंद्रपुरही भारी; सुधीर मुनगंठीवार

सर्वाधिक रोजगार देण्याची क्षमता शेती उद्योगात आहे

कल्याण पाचंगणे

माळेगाव : बारामती शेती,शिक्षण आणि संशोधनात भारी ठरत आहे, पण आमचेही चंद्रपुर त्यापेक्षा भारी आहे. त्यामुळे चंद्रपुरसह राज्यात शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्यासाठी नवनविन तंत्रज्ञान पहाणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे महाराष्ट्र सरकारचा मंत्री म्हणून आमचे काम आहे.

सर्वाधिक रोजगार देण्याची क्षमता शेती उद्योगात आहे. त्या हेतूने अॅग्रीरल्चरल डेव्हलपेंट ट्रस्ट, कृषि विज्ञान केंद्र, देशी गायींचे संगोपन आदी शेती व शेती पुरकर व्यवसाय पहाण्याच्या दृष्टीने बारामती दौरा केला. निश्चितपणे हे प्रयोग राज्यभर शेतकऱ्यांसाठी राबविल्यास शेती क्षेत्रातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल, असे मत वन मंत्री सुधीर मुनगंठीवार यांनी व्यक्त केले.

बारामती-शारादानगर येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,कृषी विज्ञान केंद्राला भेट देण्यासाठी वन मंत्री सुधीर मुनगंठीवार आज आले होते. त्या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, सीईओ निलेश नलावडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, मंत्री मुनगंठीवार म्हणाले,``बारामतीत नुकतेच पार पडलेले ``कृषक प्रदर्शन 2023`` बांधावरचे संशोधनासह अधुनिक टेक्नाॅलाॅजीमुळे महाराष्ट्रभर गाजले. त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना झाल्याचे खुद्द कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत सांगितले. त्यामुळे बारामतीमधील शिवारात कशापद्धतीने बांधावरचे प्रयोग उभारले आहेत, संशोधक शेतकऱ्यांच्या यशकथा जानून घेण्यासाठी मी राजकारणाविरहीत बारामतीचा दौरा केला.

अर्थात तो दौरा फायद्याचा ठरला की नाही हे प्रथमता चंद्रपूरात शेतीमध्ये काही नविन गोष्टी केल्याखेरीज सांगता येणार नाही.`` भरड धान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि रज्य सरकार प्रयत्नशिल आहे असे सांगून मुनगंठीवार म्हणाले,``पोषण अहारात भरड धान्याचा उपयोग करणे, बियाणांची मदत करणे, जैवविविधता बोर्डाच्या माध्यमातून सकर उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे.``

शेती,शिक्षण आणि संशोधनात अॅग्रीकल्चर डेव्हलमेंट ट्रस्टने मोठे काम केले आहे, त्यानुसार या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी स्वतःहा पुढाकार घेत असल्याचे सांगितले होते, याविषयी बोलताना मुनगंठीवार म्हणाले,``बारामतीला कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी जी कायद्याची चौकट आहे,ती तपासावी लागेल.

ते झाल्यानंतर बारामतीसह जेथे आवश्यक आहे तेथे सरकारच्य़ावतीने विद्यापीठाला मंजूर मिळेल.`` पंजाब, कर्नाटकने शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे, महाराष्ट्रात हा प्रयोग राबविला जाईल का, असे विचारले असता ते म्हणाले,`` कर्नाटकचे माहित नाही, परंतू मोफत विजेच्या धोरणामुळे पंजाब राज्य अर्थिक दृष्टया अडचणित आले.

महाराष्ट्रात मोफत विज देण्यापेक्षा सुर्य़प्रकाशाचा उपयोग होत असलेल्या सोलर शिस्टींमला प्रोत्साहन दिले जात आहे. तब्बल ५० हजार कोटींची मोठी गुंतवणूक करून सोलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प दरात वीज देण्याचा प्रय़त्न महाराष्ट्र सरकार करीत आहे. यापुढे शेतकरीच वीज उत्पादक कसा होईल, याकडेही सरकारने लक्षकेंद्रीत केले आहे.``

मंत्रीमंडळ विस्तार लांबला म्हणून राज्य सरकारची प्रगती थांबली नाही, असे ठासून सांगत मुनगंठीवार यांनी जलसंपदा विभागासह शिक्षण, आरोग्य आणि मुलभूत सेवासुविधांमध्ये सरकारने लोकहिताचे निर्णय घेतल्याचे सांगितले.

राजकारणासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढविणे कितपत योग्य

मंत्री मुंनगंठीवार म्हणाले, अधिवेशनाचा कालावधी वाढविणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच महत्व सुरळीत कामकाजाला आणि लोकहिताच्या मुद्दांना दिले पाहिजे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा ही केलेली मागणी चुकीची नाही.

परंतु विरोधक म्हणून त्यांनी या अधिवेशानाचा उपयोग राजकारणासाठी नव्हे तर लोकहिताच्या चर्चेसाठी करावा, ऐवढीच माझी त्यांना विनंती आहे. काॅग्रेसमध्ये पायातपाय घालून राजकारण करण्याची संस्कृती आहे, त्यामुळेच काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजिमाना देण्याचा निर्णय घेतला, असाही टोला त्यांनी यावेळी लगविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT