बबनराव शिंदे
TMB26B04242
विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून प्रतिटन तीन हजारांचा ॲडव्हान्स
टेंभुर्णी, ता. ६ : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर (युनिट क्रमांक १) आणि करकंब (युनिट क्रमांक २) या दोन्ही युनिटमध्ये २०२६-२७ चा गाळप हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात १५ ते २५ ऑक्टोबरदरम्यान गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिटन तीन हजार रुपयांप्रमाणे ॲडव्हान्स हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. यासाठी ५६ कोटी रुपये अदा केल्याची माहिती संस्थापक चेअरमन, माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
दोन्ही युनिटमध्ये आतापर्यंत एकूण तीन लाख १५ हजार ४०८ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापैकी पिंपळनेर युनिटमध्ये दोन लाख ३४ हजार ५०७, तर करकंब युनिटमध्ये ८० हजार ९०१ मेट्रिक टन गाळप झाले आहे. यापुढेही दर दहा दिवसांनी ऊस बिलाचे पेमेंट केले जाणार आहे. २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान गाळपासाठी आलेल्या उसाचे बिल दिवाळीनिमित्त पुढील तीन ते चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
कारखान्याच्या दोन्ही युनिटमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ८.३३ टक्के बोनस देण्यात आला आहे.
या वेळी व्हाईस चेअरमन पोपटभाऊ गायकवाड, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, करकंब युनिटचे जनरल मॅनेजर पी. एस. येलपले व खातेप्रमुख उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.