उसाचे वजन घटतेय;
कारखाने बंद पाडू नका
साखर संघाचे राजू शेट्टी यांना विनंती पत्र
अॅग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : ‘‘पावसाअभावी ऊस वाळत असून, त्याचे वजन दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी साखर कारखाने बंद पाडू नयेत,’’ असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना पाठविलेल्या पत्रातून केले आहे.
साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) आणि इथेनॉलच्या दरवाढीबाबत सरकारने समिती नेमली आहे. मात्र, याबाबत लवकर निर्णय होत नसल्याने संघटनेने रणनीती बदलून आपला मोर्चा साखर कारखान्यांकडे वळविला आहे. यामुळे साखर उद्योगाचे नुकसान होणार असल्याचे साखर संघाने पत्रात नमूद केले आहे.
जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाची मोठी तूट राहिली. सप्टेंबरनंतरही परतीचा पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांत उसाला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे ऊस वाळत असून, त्याचे वजन कमी होत आहे. कमी वजनाचा ऊस कारखान्याला गेल्यास शेतकऱ्यांना कमी पैसे मिळतील. तसेच उसातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास कारखान्यांनाही नुकसान होऊ शकते. उसाचे वजन घटल्यामुळे ऊसतोडणी मजूर आणि वाहतूकदारांच्या उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. वाळलेला ऊस तोडण्यास मजूर तयार होतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने आंदोलन मागे घेऊन गाळप सुरळीत होण्यास मदत करावी, असे आवाहन साखर संघाच्या पत्रात करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.