उसाचे क्षेत्र, एकरी उत्पादन वाढणे गरजेचे
बाळासाहेब थोरात ः निर्यात थांबल्याने साखर उद्योग अडचणीत
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः दूध आणि ऊस हे शाश्वत उत्पादन देणारे पीक आहेत. त्यांना जपले पाहिजे साखर व्यवसाय सध्या अडचणीत असून निर्यात थांबली आहे. खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत असून स्पर्धा वाढली आहे. अशा काळात उसाचे क्षेत्र वाढवण्याबरोबर उसाची उत्पादकता एकरी शंभर टन करावी, असे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. साखरेची निर्यात थांबली असल्याने साखर उद्योग अडचणीत आहे, असे थोरात म्हणाले.
संगमनेर तालुक्यात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातर्फे दोन दिवस ऊस विकास मेळावे घेते. जोर्वे (ता. संगमनेर) येथे झालेल्या मेळाव्यात भाऊसाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, पांडुरंग पाटील घुले, मृदा शास्त्रज्ञ डॉ. अभिनंदन पाटील, बुवाजी बाबा पुणेकर, शरद थोरात, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, गणपतराव सांगळे, रामदास पा. वाघ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे, कृष्णा दिघे, शेतकी अधिकारी बाळासाहेब सोनवणे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने निर्यात थांबवल्यामुळे साखर व्यवसाय अडचणीत आला आहे. साखर कारखानदारी अडचणीत आली तर अर्थव्यवस्था कोलमडेल. अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. अशा काळामध्ये मोठी स्पर्धा वाढली आहे. आपल्या कारखान्यात अल्कोहोल, वीज निर्मिती काटकसर योग्य वेळी योग्य निर्णय यामुळे चांगली वाटचाल सुरू आहे. दुष्काळी भागासाठी आपण नीळवंडे धरण व कालवे पूर्ण केले डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सुरू आहे. उसाचे क्षेत्र वाढवण्याबरोबर एकरी उत्पादकता वाढवली पाहिजे. याचबरोबर रोटेशन सुरू असताना ११ तास वीज मिळाली पाहिजे. अकरा तास वीज हा न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र आता फक्त पाच ते सहा तास लाईट मिळत आहे. तरी सर्वजण गप्प आहेत. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पा. घुले यांनी आभार मानले.
चौकट.....
एकरी १०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट
बाळासाहेब थोरात म्हणाले, की कारखान्यावर सभासद, शेतकरी आणि कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास आहे. आपण सातत्याने चांगला भाव दिला असून ऊस उत्पादकांचे हित जपले आहे. आगामी काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढवण्याबरोबर एकरी १०० टन उत्पादन झाले पाहिजे. याकरिता १०० टन ऊस उत्पादन हे प्रत्येक शेतकऱ्याचे उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी कारखान्याच्या कृषी व ऊस विकास विभागाची मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.