पुणे

नगर ः जळीत ऊसाची तोडणी सुरू तीन कारखान्यांचा पुढाकार

CD

जळीत ऊसाची तोडणी सुरू
तीन कारखान्यांचा पुढाकार

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरापूर, ता. शेवगाव : आव्हाणे खुर्द (ता. शेवगाव) येथील शहापूर शिवारात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे १५० एकरांवरील ऊस जळून खाक झाल्याच्या घटनेनंतर बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे. जळालेल्या उसाची तोडणी सुरू झाली असून वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या तीन कामगार टोळ्या, ज्ञानेश्वर व वरखेड कारखान्याची प्रत्येकी एक ऊसतोडणी मशीन कार्यरत झाली आहे.

आव्हाणे खुर्द (ता. शेवगाव) येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्यांच्या उभ्या उसाचे मोठे नुकसान झाले होते.अनेक महिन्यांच्या कष्टाने वाढविलेला ऊस आगीत जळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. जळालेला ऊस वेळेत तोडून गाळपासाठी पाठविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. यासंदर्भात बाधित शेतकऱ्यांनी महावितरणकडे नुकसानभरपाईसह जळालेल्या उसाच्या तोडणीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर वृद्धेश्वर, ज्ञानेश्वर आणि वरखेड साखर कारखान्यांनी तोडणीसाठी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. वृद्धेश्वर कारखान्याने तीन टोळ्यांमार्फत ज्ञानेश्वर व वरखेड येथील स्वामी समर्थ कारखान्याने एक मशीन लावून प्रत्यक्ष तोडणीच्या कामास सुरुवात केली आहे. कारखान्यांच्या सहकार्यामुळे जळालेला ऊस वजन घटू नये म्हणून लवकरात लवकर गाळपासाठी पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातून बाधित शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

उर्वरित जळीत उसाचीही तातडीने तोडणी करून गाळपाचे नियोजन करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान,आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगर येथील महावितरणच्या विद्युत निरिक्षक व पथकाने घटनास्थळी समक्ष पाहणी करून शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लालपरीच्या जादा फेऱ्या, मुंबई विभागाचा मोठा निर्णय

Mumbai News: समुद्रात उभे राहणार नौकांचे शहर! मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळणार; कसा असेल ९२२ कोटींचा प्रकल्प?

Marathi News Live Updates : बारामतीत यंदा पाडव्याचा पारंपरिक सोहळा रद्द! शरद पवारांच्या कुटुंबाचा मोठा निर्णय, दिवाळी साजरी न करण्याचा भावनिक पवित्रा

Beed Crime : घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बीड एलसीबीने केला पर्दाफाश; ​४ गुन्हे उघडकीस; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिल्लीत इंडिया आघाडीची 'मॉक संसद'! मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रतिकात्मक महाभियोग; ज्ञानेश कुमारांची खुर्ची धोक्यात?

SCROLL FOR NEXT