workar.jpg 
पुणे

...तर साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने साखर कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी येत्या 15 दिवसांत त्रिपक्षीय वेतन समिती गठीत करावी. अन्यथा येत्या गाळप हंगामात साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही. तसेच, ऐन गाळप हंगामात कामगार अचानक संपावर जातील, असा इशारा साखर कामगारांनी दिला.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्यावतीने साखर आयुक्तालयावर बुधवारी (ता. 28) मोर्चा काढण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, सुभाष काकुस्ते, राऊ पाटील, अशोक बिराजदार, डी. बी. मोहिते, रावसाहेब भोसले, राजेंद्र तावरे, सुरेश मोहिते, नितीन बेनकर या पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातील साखर कामगार सहभागी झाले होते. त्यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले.

काळे म्हणाले, साखर कामगारांच्या वेतनाबाबतची त्रिपक्षिय समितीची मुदत संपून
पाच महिने झाले आहेत. सरकारने नवीन समिती गठीत करून कामगारांच्या प्रश्नाना चालना द्यावी. साखर कामगारांचे थकीत वेतन, बंद पडलेल्या साखर कामगारांचे प्रश्न गंभीर आहेत. परंतु साखर कामगारांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही. सरकारने योग्य भूमिका न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत कामगारांची ताकत दाखवून देऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Numerology : 'या' 2 मूलांकाच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचे सिक्रेट; सरड्यासारखे रंग बदलून जगापुढे करतात तुमची नाचक्की

Latest Marathi News Live Update : पुण्यात बोरवेलमुळे मेट्रो बोगद्याला भगदाड, मेट्रोचे काम सुरू असलेल्या बोगद्यात पाण्याची गळती

SCROLL FOR NEXT