पुणे

कोल्हापूर:राज्यातील 171 कारखान्यानी दिली एफआरपी ची पूर्ण रक्कम

CD

१७१ कारखान्यांकडून
पूर्ण ‘एफआरपी’ अदा

साखरेच्या दरवाढीमुळे थकीत बिले देण्यात गती

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : राज्यात २०२५-२६ गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीपैकी ९९.३७ टक्के रक्कम अदा करण्यात आली असून, अद्याप २५६ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी शिल्लक आहे. साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२६ अखेर प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यात २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीपैकी ९९.३७ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. अद्याप २५६ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी शिल्लक असून, साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२६ अखेर प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
आकडेवारीनुसार, राज्यातील २१० साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला. या कारखान्यांनी मिळून १,०४५.६३ लाख टन ऊस गाळप केला. या उसासाठी तोडणी व वाहतूक खर्चासह ४०,४४६ कोटी रुपये इतकी एकूण एफआरपी देय होती. तर हा खर्च वगळता ही रक्कम ३०,२७८ कोटी रुपये होती.
कारखान्यांनी तोडणी व वाहतूक खर्चासह ४१,५६८ कोटी रुपये, तर हा खर्च वगळता ३१,३९९ कोटी रुपये अदा केले आहेत. त्यामुळे देय रकमेच्या तुलनेत अनुक्रमे १०२.७७ टक्के आणि १०३.७० टक्के रक्कम वितरित झाली आहे. काही कारखान्यांनी मूलभूत एफआरपीपेक्षा अधिक दराने ऊसबिले दिल्यामुळे ही टक्केवारी १०० पेक्षा जास्त झाली आहे.
प्रत्यक्ष अदा केलेली एफआरपी तोडणी व वाहतूक खर्चासह ४०,१९० कोटी रुपये असून, प्रत्यक्ष थकबाकी २५६ कोटी रुपये आहे. त्यामुळे प्रत्यक्ष एफआरपी अदा करण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के इतके झाले आहे.

३९ कारखान्यांकडे
काही रक्कम थकीत
राज्यातील १७१ कारखान्यांनी शेतकऱ्यांची १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. ३४ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के, दोन कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के, तर तीन कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी अदा केली आहे. एकूण ३९ कारखान्यांकडे एफआरपीची काही रक्कम थकीत असून, त्यापैकी १० कारखान्यांविरोधात महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) जारी करण्यात आले आहे. राज्यातील उर्वरित कारखान्यांनी शेतकऱ्यांची देयके वेळेत अदा केल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.


‘थकीत रक्कम
वेगाने देणे सुरू’
गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक बाजारात साखरेचे दर सातत्याने चार हजार रुपयांच्या आसपास आहेत. ज्या साखर कारखान्यांकडे काही प्रमाणात साखरेचा साठा शिल्लक आहे, त्यांना त्याचा फायदा झाला आहे. साखर विक्रीतून चांगली रक्कम मिळत असल्याने कारखान्यांनी एफआरपीची देयके अदा करण्यास गती दिली आहे. त्यामुळे एफआरपीची थकीत रक्कम वेगाने अदा होत असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Marathi News Live Updates : पुण्यात उंड्री मुख्य मार्गावर सांडपाणी वाहिनीच्या चेंबरचे झाकण तुटल्याने अपघाताचे सत्र सुरुच

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT