पुणे

नव्या गाळप हंगामाच्या तोंडावर १७५ कोटींची एफआरपी थकीत

CD

गाळप हंगामाच्या तोंडावर
१७५ कोटींची ‘एफआरपी’ थकीत

२५ साखर कारखान्यांकडे देणी अद्याप बाकी; १५ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यातील नव्या ऊस गाळप हंगामाला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असताना, मागील २०२५-२६ हंगामातील शेतकऱ्यांची सुमारे १७५ कोटी रुपयांची रास्त व किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी अद्याप थकीत आहे. २५ साखर कारखान्यांकडे ही रक्कम बाकी असून, नव्या गाळप हंगामाच्या तोंडावर थकीत एफआरपी कधी मिळणार, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
मागील हंगामात ऊसतोडणी व वाहतूक खर्चासह शेतकऱ्यांना देय असलेली एफआरपीची एकूण रक्कम ४० हजार ४४६ कोटी रुपये होती. त्यापैकी साखर कारखान्यांनी ४० हजार २७१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत. त्यामुळे एकूण देय एफआरपीपैकी ९९.५७ टक्के रक्कम अदा झाली असून, सुमारे १७५ कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत.
राज्यातील जवळपास १८५ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम पूर्णपणे अदा केली आहे. मात्र, २५ कारखान्यांकडील देणी अद्याप बाकी आहेत. संबंधित कारखान्यांच्या सुनावण्या घेऊन येत्या पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा करून घेण्याचे आव्हान साखर आयुक्तालयासमोर आहे.
दरम्यान, सुनावणीनंतरही एफआरपीची रक्कम अदा न करणाऱ्या १५ साखर कारखान्यांविरुद्ध महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार अर्थात आरआरसीनुसार जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी वेळोवेळी दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून थकीत रक्कम किती वेगाने वसूल केली जाते आणि शेतकऱ्यांना पैसे कधी मिळतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे आंदोलन तीव्र; राहुल गांधींसह नेते रस्त्यावर

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT