दामाजी कारखान्याकडून जानेवारीतील ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
मंगळवेढा, ता. ३ ः श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चालू हंगामातील १ ते १५ जानेवारी या पंधरवड्यात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मे. टन २८५० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.
धनश्री पतसंस्था मंगळवेढा, जिजामाता पतसंस्था, रतनचंद शहा बँक, लक्ष्मी पतसंस्था अरळी, भैरवनाथ पतसंस्था, ज्ञानेश्वरी सोसायटी, शंभु महादेवा मल्टिस्टेट सोसायटी तसेच शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे वैयक्तिक चेक देण्याची व्यवस्था केली आहे.
अध्यक्ष पाटील म्हणाले, कारखान्याचा गळीत हंगाम १८ फेब्रुवारी २०२६ रोजी झाला असून, पुढील गळीत हंगामासाठी ऑफ सिझनमधील सर्व प्रकारची कामे वेळेत पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. सर्वोच्च सहकार्यातून शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगार पगार, तोडणी वाहतूक ठेकेदारांची बिले वेळेवर देण्याचे काम संचालक मंडळाने केले. सर्व सभासद-शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकरी-कर्मचारीचे सहकार्याने चालू गाळप हंगाम पार पडल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.