पुणे

सोलापूर जिल्ह्यात 217 कोटी 48 लाख रुपये उसाची एफआरपी थकीत ; कारखानदारांनी थकीत पेमेंट 15 टक्के व्याजदराने द्यावे- प्रा.सुहास पाटील यांची मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे मागणी

CD

TMB26B03935
मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांना निवेदन देताना प्रा. सुहास पाटील.

एफआरपीच्या थकीत २१७ कोटींवर १५ टक्के व्याज देण्याची मागणी

टेंभुर्णी, ता. १५ : सोलापूर जिल्ह्यात सन २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम संपून तीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांची २१७ कोटी ४८ लाखांची एफआरपी साखर कारखान्यांकडे थकीत आहे. ऊसदर नियंत्रण कायदा १९६६ नुसार १४ दिवसांनंतरच्या थकीत रकमेवर १५ टक्के व्याजदराने पेमेंट देण्यात यावे, अशी मागणी ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य तथा रयतक्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राजेशकुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील जिल्हानिहाय ऊस गाळप हंगाम व साखर उताऱ्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रा. सुहास पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील २१७ कोटी ४८ लाख रुपयांची एफआरपी थकीत असल्याचे मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून दिले.
सोलापूर जिल्ह्यातील ३६ साखर कारखान्यांपैकी २३ कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना एफआरपी अदा केलेली नाही. प्रा. पाटील यांनी सांगितले की, चालू गाळप हंगामात एफआरपी आणि कारखान्यांनी जाहीर केलेला दर मिळून सुमारे ३६० कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे ऊसबिल मिळवून देण्यासाठी संघटित लढा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT