पुणे

गौरी-गणपतीमुळे साखरेला तेजीची गोडी

CD

मंचर, ता. १९ : गणेशोत्सव, गौरी-गणपती आणि दिवाळीच्या सणांची चाहूल लागताच साखरेच्या बाजाराला तेजीची गोडी लागली आहे. मंचरसह जिल्ह्यातील बाजारात बुधवारी (ता. १९) एस-३० श्रेणीतील साखरेला प्रतिकिलो ५८ रुपये असा दर मिळाला.
निविदा प्रक्रियेद्वारे व्यापाऱ्यांनी या दराने साखरेची खरेदी केली. विशेष म्हणजे, ता. १८ जून रोजी याच एस-३० श्रेणीतील साखरेची निविदेद्वारे ३९ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी झाली होती. अवघ्या दोन महिन्यांत साखरेच्या दरात १९ रुपये म्हणजे सुमारे ४८.७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

सरकारकडून देशांतर्गत बाजारासाठी निश्चित करण्यात येणारा मासिक साखर विक्री कोटाही बाजारातील पुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक ठरतो. त्यामुळे उत्पादन, उपलब्ध साठा, विक्री कोटा आणि सणासुदीची मागणी या सर्व घटकांचा परिणाम साखरेच्या दरावर होत आहे.

सणासुदीमुळे मागणी वाढणार
गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मिठाई विक्रेते, बेकरी व्यावसायिक, खाद्यपदार्थ उत्पादक तसेच किरकोळ व्यापारी सणांच्या पार्श्वभूमीवर साखर खरेदी करतात. त्यामुळे बाजारातील मागणी वाढत असून, त्याचा थेट परिणाम दरावर होत आहे.


सणासुदीच्या काळात साखरेची मागणी नेहमीच वाढते. यंदा त्यातच बाजारातील उपलब्धता कमी असल्याने दरात तेजी दिसत आहे.
- दिनेश खुडे, साखर खरेदीदार, मंचर

ऊस उत्पादन घटल्याचा परिणाम
आगामी हंगामात ऊस उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने व सणासुदीमुळे साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने साखरेच्या बाजारात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.


दरवाढीने ऊस उत्पादकांच्या आशा उंचावल्या
साखरेच्या दरातील वाढीमुळे साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीला आधार मिळण्याबरोबरच त्याचा सकारात्मक परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळण्याची अपेक्षा आहे.

दरातील वाढ, प्रतिकिलो रुपयांत
ता. १८ जून : ३९
१९ ऑगस्ट : ५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Ban: महाराष्ट्रात आता खुलं तेल विकता येणार नाही! FDA चा मोठा आदेश; पॅकेटवर सोर्स आणि एक्सपायरी डेट बंधनकारक

AB de Villiers: "सचिन तेंडुलकरपेक्षा विराटच कसोटीत भारी..." डिव्हिलियर्सच्या सनसनाटी दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update: रंकाळा परिसरातील 100 हून अधिक खाद्यगाड्यांवर कारवाई

Thane Civic Promotion : ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त (१) पदावर मनीष जोशी यांची पदोन्नती; नगरविकास विभागाचा शासन आदेश जारी

Daund Beheading Case: दौंडमध्ये ७० वर्षीय महिलेचा शिरच्छेद करून खून; दोन संशयित अटकेत, शिराचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT