पुणे

दिवाळीच्या गोडव्याला महागाईची फोडणी; साखर ६० रुपयांवर!

CD

दिवाळीच्या गोडव्याला महागाईची फोडणी!
साखर ६० रुपयांवर; घाऊक बाजारात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३ : दिवाळीच्या सणामुळे साखरेची मागणी वाढू लागल्याने घाऊक बाजारात दराने उसळी घेतली आहे. महिनाभरापूर्वी प्रतिक्विंटल ५,४०० रुपयांवर असलेली साखर आता ५,६०० रुपयांवर पोचली आहे. क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाल्याने किरकोळ बाजारात ग्राहकांना प्रतिकिलो ६० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या गोडव्याला महागाईची फोडणी बसली आहे.
केंद्र सरकारने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी १३ लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला असला, तरी नवीन हंगामातील उत्पादनाची आवक अद्याप मर्यादित आहे. गत हंगामाच्या अखेरीस शिल्लक राहिलेला साखरेचा साठाही तुलनेने कमी आहे. त्यामुळे दिवाळीत मागणी आणखी वाढल्यास दरात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र, ऊसदर आंदोलनामुळे कारखाने अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. परिणामी नवीन साखरेचे उत्पादन आणि बाजारातील आवक अपेक्षित वेगाने वाढलेली नाही.
ऑक्टोबरमध्ये उत्पादित झालेली नवीन साखर नोव्हेंबरमध्ये विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या कारखान्यांकडील निविदांमध्ये साखरेचे दर प्रतिक्विंटल पाच हजार ते पाच हजार १०० रुपयांदरम्यान आहेत. घाऊक बाजारातील दर मात्र ५,६०० रुपयांवर पोचले आहेत. महिनाअखेरीस मागणी कमी असली, तरी दिवाळीमुळे आता खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.
दिवाळीनंतर कारखान्यांचा गाळप वेग वाढण्याची आणि ऊसतोडीसाठी कामगारांची उपलब्धता सुधारण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे साखरेची आवक वाढू शकते. मात्र, तोपर्यंत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहिल्यास दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
---
कोट
साखरेचे दर प्रतिक्विंटल ५,४०० रुपयांवरून वाढून ५,६०० रुपयांवर स्थिरावले आहेत. किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६० रुपये दर आहे. वाहतूक, हमाली आणि पॅकिंग आदी खर्चांमुळे किरकोळ बाजारात अधिक दराने साखर विकावी लागत आहे. दुष्काळी स्थितीमुळे गहू आणि तांदळाच्या खरेदीवर परिणाम झाला आहे; मात्र साखरेच्या खरेदीवर त्याचा परिणाम दिसत नाही.
- विजय अग्रवाल, व्यापारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

Crime News: यूपीतील भाजप नेत्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल! व्हिडिओमध्ये कोणावर केले आरोप? 'माझ्या मृत्युला पत्नी...'

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

Rahul Gandhi: '२४ तास झाले, आता तरी चर्चेला या!' राहुल गांधींचे मोदींना पुन्हा आव्हान; एपस्टीन प्रकरणही उकरून काढले

SCROLL FOR NEXT