पुणे

साखरेच्‍या दराने गाठली पंचाहात्तरी..!

CD

नाशिक, ता. २१ : साखरेच्‍या दरांचा आलेख उंचावत चालला आहे. गेल्‍या दोन दिवसांत प्रतिकिलो १५ रुपयांनी दरवाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत किरकोळ बाजारात साखर ७२ ते ७५ रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. साखरेपाठोपाठ गुळाच्‍या किमतीमध्येही लक्षणीय वाढ झाली असल्‍याने एरवी सर्वसामान्‍यांचे तोंड गोड करणारे हे पदार्थ आता ‘कडू’ वाटू लागले आहेत.
साखरेच्‍या दरांमध्ये गेल्‍या पंधरा दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एरवी बाजारपेठेत ३८ ते ४० रुपये प्रतिकिलो मिळणारी साखर काही दिवसांपूर्वी थेट ६० रुपयांवर पोचली होती. केवळ राज्‍यातच नव्‍हे तर देशात मागणीच्‍या तुलनेत पुरवठा कमी असल्‍याने, ही दरवाढ झाल्‍याचे व्‍यावसायिकांचे म्‍हणणे आहे. तसेच नवीन हंगामातील साखर येण्यासाठी डिसेंबर उजाडणार असल्‍याने ऐन सण- उत्‍सवांच्‍या काळात साखर कडवट होत चालली आहे. पुढील काही महिने साखरेचे दर चढेच राहण्याचा अंदाज व्‍यावसायिकांनी वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : “पेपरफुटी थांबलीच पाहिजे!” विद्यार्थी आंदोलनात उतरले सुजात आंबेडकर, मागण्यांना जाहीर पाठिंबा देत सरकारवर ताशेरे

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT