पुणे

हेड साखर साठ्याचे नियम कठोर

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२० ः देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर प्रतिकिलोला साठ रुपयांवर गेल्यामुळे केंद्र सरकारने साठेबाजीसंबंधीचे नियम अधिक कठोर केले आहेत. कच्चा माल म्हणून साखरेचा वापर करण्यासह इतर सर्व कामांसाठी घाऊक व्यापारी आणि साठाकर्त्यांना दहा मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर पंधरा दिवसांपेक्षा अधिककाळ स्वत:कडे ठेवता येणार नाही. यापूर्वी ही मर्यादा एक महिना इतकी होती. साखर साठ्याच्या बाबतचा हा निर्णय  १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू असेल. 
देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा वाढावा तसेच आगामी सणासुदीच्या काळात ग्राहकांना माफक दरात साखर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक वापरकर्त्यांना देखील साठ्याचा वरील नियम लागू राहणार आहे. औद्योगिक वापरकर्त्यांमध्ये शीतपेय निर्माते, चॉकलेट-मिठाई उत्पादक आणि फळ प्रक्रिया उद्योगांचा समावेश होतो.

गुळही महागला
मागील काही दिवसांत साखरेचे दर ६० रुपयांच्या वर गेले आहेत. ब्रॅंडेड साखरेचा विचार केला तर हे दर शंभर रुपयांच्या आसपास पोहोचल्याचे दिसते. दुसरीकडे गुळाचे दरही भडकले आहेत. गुळाचे किलोचे दर शंभर रुपयांवर पोहोचले आहेत. साखर उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून वापराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

यांना नियम
लागू नाही
- केंद्र सरकार
- राज्य सरकार
- केंद्रशासित प्रदेश
- स्थानिक संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan News: शहबाज शरीफ सरकारला मोठा धक्का! पाकिस्तानातील २५ मंत्रालये बनावट; तातडीने बरखास्त करण्याची शिफारस

ऑनलाईन शॉपिंग कंपनी Meesho वर गुन्हा दाखल! मुलाच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी आईला सापडला धक्कादायक पुरावा

Mumbai Crime: १७ वर्षीय पुतण्यानेच काकाचा जीव घेतला, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला, तक्रारदार बनून पोलिसात गेला पण...

iPhone 17 Pro Max वर बंपर डील! 1.47 लाखांचा फोन फक्त 77,800 रुपायांमध्ये; जाणून घ्या काय आहे ऑफर?

Latest Marathi News Live Update: मोशी कचरा डेपो दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर

SCROLL FOR NEXT