पुणे

राहाता ः- विखे पाटील सह.साखर कारखान्याचा बाॅयलर अग्नीप्रदिपन सोहळा संपन्न

CD

सतीश वैजापूरकर
राहाता, ता.२०।९।२६
----------------
SHD26B06014
प्रवरानगर (ता. राहाता) ः पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर अग्निप्रदीपन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शालिनी विखे पाटील. समवेत कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील.


प्रतिकूल परिस्थितीत हंगाम यशस्वी करा
राधाकृष्ण विखे पाटील ः विखे कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात
राहाता, ता. २० ः दुष्काळी परिस्थिती, घटलेले ऊस उत्पादन आणि पाणीटंचाई, अशी यंदा प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यावर मात करून यंदा बारा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून हंगाम यशस्वी करायचा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कैलास तांबे, उपसभापती अण्णासाहेब कडू, ट्रक वाहतूक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, अध्यक्ष मकरंद गुणे, उपाध्यक्ष विजय लगड, शांतिनाथ आहेर आणि कार्यकारी संचालक महेश कोनापुरे आदींसह सभासद व कामगार उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या साखर धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारीला मोठा आर्थिक आधार मिळाला. यंदा पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. शेतीच्या पाण्यासाठीही योग्य नियोजन करून ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी राखून ठेवावे लागेल. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे आणि उसाचे एकरी उत्पादन कसे वाढविता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करावा लागेल.

कोट---------------------------------
कामगारांनी परिश्रम घेऊन कारखाना गळितासाठी सज्ज केला. अहिल्यानगर जिल्ह्यात उच्चांकी गाळप आणि उच्चांकी साखर उतारा देणारा कारखाना म्हणून प्रवरा कारखान्याची अग्रगण्य कामगिरी राहावी, या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
- डॉ. सुजय विखे पाटील, अध्यक्ष, पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT