पुणे

कोल्हापूर: सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी १३ लाख टन साखर कोटा

CD

तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

पहिल्यांदाच पंधरवड्यासाठी कोटा जाहीर; केंद्राची सावध पावले

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेची उपलब्धता आणि दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी १३ लाख टन साखर विक्री कोटा निश्चित केला आहे. १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत हा कोटा कारखान्यांसाठी लागू राहणार आहे.
केंद्राच्या अन्न मंत्रालयाने रविवारी (ता. ३०) या बाबतची घोषणा केली. विशेष म्हणजे, मासिक कोटा पद्धतीऐवजी पंधरवड्याचा कोटा निश्चित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जाहीर करण्यात आलेला हा पहिलाच कोटा आहे. या कोट्यात देशातील सर्व साखर कारखाने तसेच बंदरांवरील (पोर्ट) रिफायनरींच्या साठ्याचा समावेश करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२६ साठी केंद्र सरकारने देशांतर्गत विक्रीसाठी २२.५० लाख टन साखर कोटा निश्चित केला होता. ऑगस्ट २०२५ मध्येही एवढाच कोटा देण्यात आला होता. त्यापूर्वी जुलै २०२६ साठी २२ लाख टन साखर विक्री कोटा निश्चित करण्यात आला होता.
साखरेची देशांतर्गत उपलब्धता सुरळीत ठेवणे, मागणी-पुरवठ्यात संतुलन राखणे तसेच बाजारातील दरांमध्ये अचानक मोठी चढ-उतार होऊ न देणे, हा कोटा पद्धतीमागील प्रमुख उद्देश आहे. आता सप्टेंबरमध्ये पंधरवड्यानुसार कोटा निश्चित केल्याने बाजारातील साखर उपलब्धतेवर अधिक बारकाईने नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात साखरेची मागणी, बाजारातील उपलब्ध साठा आणि विक्रीची स्थिती यावर साखरेच्या दराची दिशा अवलंबून राहणार आहे. नव्या पंधरवड्याच्या कोटा पद्धतीमुळे कारखान्यांच्या विक्री नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान देशांतर्गत साखरेच्या दरातील अलीकडील मोठ्या घसरणीनंतर बाजारपेठेत दर स्थिरावले आहेत. महाराष्ट्रातील बाजारात साखरेचे दर तुलनेने स्थिर असले, तरी उत्तर प्रदेशातील बाजारात मागणी मंदावल्याने आणि साखरेची उपलब्धता वाढल्याने क्विंटलमागे सुमारे १०० ते २०० रुपयांची घट झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या साखर साठ्याच्या अलीकडील उच्चांकी दराच्या तुलनेत कारखाना पातळीवरील साखरेच्या दरात सुमारे २० टक्क्यांची घसरण झाली आहे. आगामी काळात साखरेचा पुरवठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चौकट ---
क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची घट
सध्या कोल्हापूर बाजारपेठेत एस-ग्रेड साखरेचा दर ४८२० ते ४९०० रुपये प्रति क्विंटल आहे. तर मुझफ्फरनगर बाजारात एम-ग्रेड साखरेचा दर ५३५० ते ५४०० रुपये प्रति क्विंटल असून, त्यात क्विंटलमागे सुमारे १०० ते २०० रुपयांची घट झाली आहे. नव्या पाक्षिक कोटा पद्धतीमुळे बाजारातील आवक-विक्रीचे स्वरूप बदलण्याची शक्यता असून, आगामी काळात साखरेच्या दरांची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

गौतम गंभीरचा 'विश्वासू' चमकला; संघ संकटात असताना पठ्ठ्या उभा राहिला, श्रेयस अय्यरला वर्ल्ड कप २०२७ साठी टफ फाईट

Tea Price Hike: 'कटिंग' ला महागाईचा कट! साखर, दूध, गॅस, चहाच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीची शक्यता

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एक ठार, १० प्रवासी गंभीर

ट्विंकल खन्नावर मुंढे इफेक्ट! तुकाराम मुंढेंनी हॉटेल चेक केलंय का…? आधी प्रश्न विचारला मग पनीर मागवलं, पुढे...

SCROLL FOR NEXT