पुणे

सुप्यातील विद्यार्थ्यांनी घेतली वीज निर्मितीची माहिती

CD

सुपे, ता. ३ ः ऊस गाळपानंतर उरणाऱ्या बगॅसपासून वाफ निर्मिती करून टर्बाइनच्या सहायाने विद्युत निर्मिती कशी केली जाते याची माहिती विद्या प्रतिष्ठानच्या सुपे (ता. बारामती) येथील सुपे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली.
महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास नुकतीच भेट देऊन माहिती घेतली. अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच औद्योगिक प्रक्रियेची थेट माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी या औद्योगिक भेटीचा उपक्रम राबवल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय काळे, प्रा. निकिता गाडेकर यांनी दिली.
या भेटीत वितरण नियंत्रण प्रणालीच्या माध्यमातून एकूणच प्रकल्पाचे नियंत्रण कसे केले जाते. याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना पहायला मिळाले. येथील उपकरणशास्त्र अभियंता अभय चव्हाण, डीसीएस नियंत्रक समीर यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान साखर निर्मितीची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या आनंदनगर उड्डाण पुलावर अपघात

Rashmika & Vijay : रश्मिका–विजयचा विवाहसोहळ्यानंतर गावात पूजाअर्चा, देशभर अन्नदान

Iran Israel War: युद्धाच्या छायेत युपीचे ६ हजार कामगार सुरक्षित! योगी सरकारची मोठी घोषणा; मदतीसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

SCROLL FOR NEXT