पुणे

उशिरा तुटलेल्या उसाला वाढीव अनुदान द्या

CD

सोमेश्वरनगर, ता. ११ : सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड करण्यासाठी तोडणी यंत्रणा पाच ते दहा हजार रुपये उकळत आहेत. आतापर्यंत कारखान्याने काहीही कारवाई केलेली नाही. कारखान्याने नुकसानीची जबाबदारी घेऊन उशिराने म्हणजे फेब्रुवारीत तुटलेल्या उसाला प्रतिटन दोनशे तर मार्चमध्ये तुटलेल्या उसाला तीनशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केली सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे केली आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याने फेब्रुवारी, मार्च व एप्रिलमध्ये गाळपास येणाऱ्या अनुक्रमे १००, २०० व ३०० रुपये प्रतिटन अनुदान जाहीर केले आहे. परंतु नुकतेच वृत्तपत्राच्या बातमीतून कारखान्याने मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात कारखाना बंद होणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असेल तर एप्रिलमध्ये जाहीर केलेले ३०० रुपये अनुदान ही फसवी आणि सभासदांचा दिशाभूल केलेलीच योजना आहे. केवळ प्रसिद्धी म्हणून किंवा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून दिशाभूल करण्याऐवजी तोडणी यंत्रणेच्या नुकसानीतून काहीशी भरपाई म्हणून फेब्रुवारी व मार्चचे अनुदान वाढवून द्यावे.
फेब्रुवारीमध्ये २ लाख ६३ हजार टन उस गाळपास आला. १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे दोन कोटी ६३ लाख रुपये सभासदांना जादा मिळाले. मात्र, सभासदांचे ऊसतोडीसाठी प्रतिएकर ४ ते ८ हजार रुपये तोडणी यंत्रणेने उकळले. त्यानुसार सभासदांचे जवळपास दोन कोटी ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच मार्च महिन्यामध्ये आजपर्यंत ६५ हजार टन उस गाळप झाला असून सभासदांना २०० रुपये प्रतिटनाप्रमाणे १ कोटी ३० लाख रुपये अतिरिक्त मिळाले. परंतु सभासदांचे ऊसतोडीसाठी प्रतिएकर पाच ते १० हजार रुपये तोडणी यंत्रणेने घेतले.

सतीश काकडे यांच्या मते
- सभासदांचे १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान
- दोन-दोन शेती अधिकारी, अध्यक्ष, संचालक मंडळ यांचे नियंत्रणच नाही.
- संबंधित वाहतूकदार व यंत्रणेवर कारवाई करावी
- सभासदांना फेब्रुवारीचे आणि मार्चचे अनुदान वाढवून द्यावे

कार्यक्षेत्रात खूप ऊस उपलब्ध आहे, असे भासविल्याने सभासदांनी विस्तारवाढीला मंजुरी दिली. पण गेली दोन वर्षे कारखान्यास गेटकेन ऊस गाळपासाठी आणावा लागत आहे. चालू हंगामात ९५ हजार टन गेटकेन प्राधान्याने आणला आणि सभासदांचा ऊस उशिरा तोडावा लागला. यामुळे सभासदांच्या जखमेवर मीठ चोळले.
- सतीश काकडे, शेतकरी कृती समितीचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: १५ वर्षांनंतर बंगालमध्ये घडणार मोठा राजकीय उलटफेर? भाजपची १६० जागांवर आघाडी

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

AC vs Cooler vs Fan : एसी, कूलर की पंखा...उन्हाळ्यात काय आहे बेस्ट? महिन्याला किती बिल येतं? जाणून घ्या

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

SCROLL FOR NEXT