sugarcane cutting worker agitation sakal
पुणे

Agitation : ऊसतोडणी कामगार आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी १२ जूनला आझाद मैदानावर आंदोलन

कामासाठी दिलेली उचल वसुलीसाठी ऊसतोडणी कामगारांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या रोजगारात घट झाल्याने त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कामासाठी दिलेली उचल वसुलीसाठी ऊसतोडणी कामगारांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या रोजगारात घट झाल्याने त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. असे असताना मात्र शिंदे-फडणवीस सरकार साखर कारखानदारांच्या दबावाखाली पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून ऊसतोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल करत आहे. या निषेधार्थ आयटक प्रणीत लालबावटा ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतूकदार युनियनच्या वतीने १२ जून रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युनियनचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी दिली.

या संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. २०२२-२३ या कालावधीत ऊसाचे एकरी उत्पादनात घट झाल्याचे साखर आयुक्तांनी जाहीर केले आहे. त्याचे गंभीर परिणाम ऊसतोडणी कामगारांना भोगावे लागत आहेत. दिवसभर राबूनही ऊसाचे पुरेसे वजन न भरल्याने ऊसतोडणी कामगारांना संपूर्ण मंजुरी मिळत नाही. या कामगारांच्या मजुरीत घट झाल्याची वस्तुस्थिती आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

ऊसतोडणी कामगार मुकादम यांच्या प्रमुख मागण्या -

- कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेले १५० गुन्हे तत्काळ स्थगित करा

- कामगारांना थेट विशेष भत्ता द्यावा

- ऊसतोडणी व स्थलांतरित कामगारांसाठी स्वतंत्र कायदा मंजूर करावा

- मराठवाड्यात ग्रामपंचायतीद्वारे ऊसतोड कामगारांची नोंदणी करावी

- ऊसतोडणी मजुरांवरील थकीत उचल रकमेचे संस्थागत कर्जात रूपांतर करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT