पुणे

मसूर : किवळ येथे शेतकरी संवाद मेळावा कार्यक्रम बातमी

CD

एकरी शंभर टन उसासाठी ‘८६०३२’ सर्वोत्तम

सुरेश माने; किवळला शेतकरी संवाद मेळावा उत्साहात

मसूर, ता. ६ : आधुनिक शेतीत वाढता उत्पादन खर्च कमी करून जास्तीतजास्त नफा मिळवण्यासाठी नियोजित तंत्रज्ञानाचा वापर करणे, ही काळाची गरज आहे. एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी को-८६०३२ ही जात शेतकऱ्यांसाठी खात्रीशीर आणि फायदेशीर आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी केले.
किवळ (ता. कऱ्हाड) येथे शेती क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचवण्यासाठी आयोजित केलेल्या ‘शेतकरी संवाद मेळाव्यात’ ते बोलत होते. किवळ विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायत आणि माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले होते.
श्री. माने म्हणाले, ‘‘ऊस लागणपूर्व मशागत करताना पारंपरिक पद्धती बदलून साडेचार ते सहा फुटांची सरी सोडावी. जेणेकरून पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल. सरीवर दोन फुटांच्या अंतरावर एक डोळा किंवा रोपाची लागण केल्यास उसाची जाडी आणि वजन वाढण्यास मदत होते. या पद्धतीमुळे बियाण्याची बचत तर होतेच, शिवाय आंतरमशागत करणेही सोपे जाते. परिणामी, मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल राखणे गरजेचे आहे.’’
मेळाव्याला माजी अधिकारी तानाजीराव साळुंखे, माई ट्रस्टच्या संगीता साळुंखे, डॉ. विजय साळुंखे, सरपंच प्रदीप काशीद उपस्थित होते. उपसरपंच प्रभाकर पवार, माजी उपसरपंच सुनील साळुंखे, सुहास साळुंखे, रामचंद्र साळुंखे, मोहन साळुंखे, अनिल नळगुणे, भानुदास साळुंखे, रामराव साळुंखे, रत्नाकर तांबे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सुनील साळुंखे यांनी आभार मानले.

B02560
किवळ : मेळाव्यात बाेलताना सुरेश माने. त्या वेळी संगीता साळुंखे, तानाजीराव साळुंखे, डॉ. विजय साळुंखे व मान्यवर.

.................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT