खुटबाव, ता. ५ : दौंड तालुक्यामध्ये आडसाली ऊस लागवडीला वेग आला आहे. सध्या बहुतांश शेतकऱ्यांचा कल एआय पद्धतीच्या उत्पादनाकडे वाढला आहे. सध्या शेतकरी साडेतीन फूट अंतरावरील सरी तसेच आधुनिक पट्टा पद्धतीने ऊस लागवड करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत ९८५० हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
चालू वर्षी आजतागायत दौंड तालुक्यामध्ये सरासरी २०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे ऊस लागवड टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
आषाढीवारी झाल्यानंतर पंढरीच्या वारीवरून माघारी परतलेला शेतकरी शेतीच्या मशागतीत गुंतला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादक तालुका म्हणून दौंड तालुका गणला जातो. मुळा-मुठा व भीमा नदीच्या बारमाही पाण्यामुळे व खडकवासलाच्या बेबी कालवा व नवा मुठा कालव्यातून मिळणाऱ्या आवर्तनामुळे दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली जाते. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतीकामात गुंतला आहे. आडसाली, पूर्वहंगामी व सुरू ऊस अशा तीन टप्प्यात उसाची लागवड केली जाते. मजूर प्रतिएकर लागवडीसाठी आठ हजार रुपये घेत आहेत. शेतकऱ्यांचा आडसाली लागवड करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
प्रामुख्याने या बेण्याला प्राधान्य
कोएम--८६०३२
फुले --२६५
कोएम- ८००५
ऊस लागवडीमध्ये को-८६०३२ या ऊस बेण्याला विशेष मागणी आहे. काही शेतकरी रोपवाटिकेतून रोप आणून ऊस लागवड करत आहेत लागवड करताना सरी पद्धती, आधुनिक पट्टा पद्धतीने लागवड करण्यावर विशेष भर दिला जात आहे. यामध्ये सरींमध्ये साडेतीन फूट तर दोन पट्ट्यातील अंतर हे साडेचार फूट ठेवण्यात येत आहे.
दृष्टिक्षेपात
- खासगी गुऱ्हाळात ३५०० रुपये टनांपर्यंत बाजारभाव
- साखर कारखान्यावर ३२०० रुपयांपर्यंत प्रतिटन दर मिळाला
- चालू वर्षी उसाच्या बेण्याचे बाजारभाव प्रतिटन १००० रुपयांनी वाढ
- यंदा ४५०० रुपये प्रतिटन दराने उसाचे बेणे खरेदी करण्याची उत्पादकांवर वेळ
- चांगल्या प्रतीच्या उसाच्या रोपासाठी प्रतिरोप तीन रुपये खर्च
- नांगरट, काकरणी, लोढणे या मशागतीचा खर्च
दौंड तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये ऊस लागवड व पेरणी योग्य पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच चांगल्या उत्पादनासाठी बीबीएफ पद्धतीने किंवा टोकन पद्धतीने पेरणी करावी. ऊस लागवडीसाठी सुपरकेन नर्सरी या तंत्रज्ञानाचा वापर करावा.
- अजिंक्य दुधाणे, तालुका कृषी अधिकारी दौंड
03763
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.