पुणे

ओल्या चाऱ्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांची वणवण

CD

MLS26B02545, MLS26B02546
सदाशिवनगर ः येथे उसाचे वाडे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झालेली गर्दी.

माळशिरसमध्ये २ लाख पशुधन; ओल्या चाऱ्याचा तुटवडा
उसाच्या वाड्यासाठी शेतकरी गुऱ्हाळावर; मकवणासाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. ३ ः तालुक्यात सुमारे २ लाखाहून अधिक पशुधन असून, सर्वत्रच ओल्या चाऱ्याचा तुटवडा जाणवत असल्याने उसाचे वाडे घेण्यासाठी सदाशिवनगर येथे शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे. काही ठिकाणी असणारा ओला चारा (मका) घेण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.

तालुक्यात शेळी एक लाख ६७ हजार ३५५, मेंढ्या ३२ हजार ८०६, गाय १ लाख ४६ हजार ७८३, म्हैस ७६ हजार २२८ असे एकूण २ लाख २३ हजार ११ पशुधन आहे. तालुक्यात मे महिन्यात पाऊस झाला त्यानंतर शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी मका पिकास पसंती दिली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पेरणी केलेली मका यापूर्वीच कापणीला येऊन संपली आहे. तालुक्यात ऊसक्षेत्र मोठे आहे. परंतु सततच्या पावसामुळे ऊस पिकाची वाढ पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. मार्च, एप्रिलपर्यंत चालणारे साखर कारखाने आत याच महिन्यात बंद होतील अशी स्थिती आहे. ऊस क्षेत्र संपले आहे. तसेच अनेक कारखान्यांनी ऊस कापणीसाठी यंत्राचा वापर केल्यामुळे उसाचे वाडे उपलब्ध झाले नाही.
तालुक्यात बैलगाडीने उसाचे गळीत केले जात होते परंतु आता वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यामुळे बैलगाडी मालक जनावरांना पुरेल असे वाडे ठेऊन जादा वाडे विकत होता. आता ते बंद झाले. दूध वाढीसाठी कोरड्या चाऱ्याबरोबर ओल्या चाऱ्याची आवश्यकता असते. काही शेतकऱ्यांकडे मका आहे, त्याचा दर आता २२ ते २५ रुपये शेकडा गुंठ्याला झाला आहे. काही वाहन चालक लासुर्णे, पाडेगाव आदी ठिकाणी असणाऱ्या गुऱ्हाळावरून वाडे आणून विक्री करीत असून, १०० रुपयास १६ पेंडी
वाडे देत ते घेण्यासाठी शेतकरी वर्ग गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हार्वेस्टरमुळे वाड्याचा तुटवडा
यंदा अतिवृष्टीमुळे उसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कारखान्याचा गाळप हंगाम कमी दिवस चालेल अशी स्थिती आहे. आणि कारखान्यांनी माणसांच्या तुटवड्यामुळे हार्वेस्टरने ऊसतोडणी सुरू केली आहे. त्यामुळे यंत्रातून वाडे मिळत नसल्याने वाड्याचा तुटवडा आला आहे.

वाडे जनावरांच्या आवडीचे
जनावरांना वाडे गोड लागत असल्याने जनावरे चवीने वाडे खातात. शिवाय हिरवा चारा यादिवसांत कमी मिळत असल्याने वाड्यावरच भिस्त असते. मात्र यंदा वाड्यासाठी पळापळ सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही विमानभाड्यात वाढ; नवा फ्यूल सरचार्ज जाहीर, जाणून घ्या नवे दर...

BAN vs PAK : यांना चौकारही अडवता येत नाही... पाकिस्तानी चेंडूसकट सीमारेषेबाहेर... धाडकन आपटला, हॉस्पिटलमध्ये पोहोचला...

पोलीस आयुक्तांच्या पत्नीच्या पायाला काटा रुतला, डॉक्टर दारू पिऊन उपचारासाठी पोहोचला; नंतर जे घडलं त्यानं...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचे नाव बदला! माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी

Dombivali Crime : मी माझ्या बायकोची हत्या करून आलो, म्हणत स्वतःच पोलीस ठाण्यात हजर; पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT