पुणे

ऊस तोड कामगार परतीच्या मार्गावर

CD

MLS26B02602
माळशिरस ः ऊस हंगाम संपल्याने गावाकडे जाण्याच्या तयारीत असलेले मजूर.

हंगाम संपल्याने ऊसतोड मजूर परतीच्या मार्गावर
अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील मजूर;

माळशिरस, ता. २५ ः सर्वच साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम संपला असल्याने अहिल्यानगर, जामखेड, नाशिक, धुळे, नंदुरबार भागातील ऊसतोड कामगार गावाकडे जाण्यासाठी तयारी करत आहेत. कारखानास्थळावर आणि शेतात टाकलेली पाले आता उठली आणि परतीच्या मार्गाला लागले आहेत.

यंदा जामखेड, अहिल्यानगर भागातील बैलगाड्यांची संख्या कामी झाली आहे. यास पर्याय म्हणून अनेक ट्रक्टर मालकांनी घंटागाड्या केल्या आहेत तर काही वाहन मालकांनी ट्रेलर केले आहे. परंतु या भागात ऊसतोडणी कामगारांची संख्या कमी असल्याने काही वर्षांपासून नंदुरबार, धुळे, नाशिक भागातून ऊसतोडणी कामगार आणले. या कामगारांना गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या गावी जाऊन वाहन मालक उचल देतात व कारखाना सुरू होण्यापूर्वी त्यांना वाहनाने आणले जाते. नंदुरबार आदी भागात मजुरांना काम नसल्याने ते ऊस तोडणीसाठी येतात. आता कारखाना बंद झाल्याने ते परतीच्या मार्गावर आहेत.

कोट MLS26B02600
- आमच्या भागात मजुरांना काम नसल्याने आम्ही ऊसतोडणीसाठी येतो, कारखाना सुरू होईपर्यंत शेतातील इतर कामे करून कुटुंब चालवतो. या वर्षी २२ मजुरांनी २३०० तन ऊस तोडला असून, प्रत्येक मजुराला ७० ते ७५ हजार मजुरी मिळाली.
- रावसाहेब सोनवणे, ब्राह्मणवेल, नंदुरबार

कोट MLS26B02601
- तीन वर्षांपासून कारखान्याला ऊस वाहतुकीचा व्यवसाय करीत आहे. आपल्या भागात ऊसतोड मजूर नसल्याने नंदुरबार, नाशिक भागात जाऊन कारखाना सुरू होण्यापूर्वी दोन महिने जाऊन तेथील मजुरांना ऊस तोडणीसाठी उचल देतो. कारखाना सुरू होण्यापूर्वी वाहनांना आणतो. या वर्षी २३०० टनाची वाहतूक करून साडेसात ते आठ लाख वाहतूक भाडे मिळाले.
- अप्पासाहेब सूळ, जळभावी, वाहनमालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात ‘नरेंद्र सरेंडर’ आंदोलन

"तिचं कौतुक पण ट्रोलर्सच्या कमेंट्स.." नॅशनल क्रश गिरीजाचे वडील नेटिझन्सवर संतापले; म्हणाले..

SCROLL FOR NEXT