sugarcane juice businessman in loss no customer due corona  
पुणे

कोरोनामुळे 'रसवंती' व्हेंटिलेटरवर; ग्राहक गोडव्यापासून दुरावले!

- संतोष खुटवड

पुणे : लॉकडाउनमुळं मागचा हंगाम वाया गेला...आता पुन्हा शहरात कोरोना वाढतोय...ऊस, बर्फ, वीज, लिंबाचं भाव वाढलेत...त्यात गिऱ्हाईक पण कमी झालेत...उसाचा रस तयार करायला होणारा खर्च व विक्री याचं गणित ग्राहकांअभावी सध्या जुळंना...त्यामुळं संसाराचं गुऱ्हाळंच बंद पडण्याच्या मार्गावर आहे...घरखर्च भागत नसल्यानं आम्ही जगायचं तरी कसं?’’ असा सवाल शनिवार पेठेतील ‘नवनाथ रसवंतीगृहा’चे चालक बाळासाहेब जामदार यांनी केला. उन्हाचा पारा वाढताच उसाच्या थंडगार रसाचा आस्वाद घ्यावा वाटतो. दर वर्षी रसवंतीगृहांच्या घुंगरांचा आवाज फेब्रुवारीपासून जूनपर्यंत ऐकायला मिळतो. पण, यावेळी कोरोनामुळे हंगामात चैतन्य दिसून येत नाही. दरवर्षी होणारी लाखोंची उलाढाल निम्म्यावर आल्याने रसवंतीगृहचालक हताश झाले आहेत. फिरत्या चाकांमधून गोडवा देणाऱ्या हा व्यवसाय संकटात सापडला आहे.


अशी आहे परिस्थिती
रसासाठी लागणारा को ४१९, कोइमतूर आदी चांगल्या प्रतीचा ऊस जुन्नर, इंदापूर, खेड शिवापूर, पुरंदर व साताऱ्याहून मागविला जातो. या उसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही या हंगामात फटका बसत आहे. कोरोनाच्या भीतीपोटी बहुतांश पुणेकरांनी रसवंतीगृहाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सध्या शहरात जालना, जळगाव, विदर्भातून येऊन रस्त्यावर उसाचा गाडा चालवणाऱ्यांही ग्राहकांची वाट पहावी लागत आहे. ग्राहकच नसल्याने रस तयार करण्यासाठी लागणारा खर्च व होणारा फायदा यामध्ये तफावत निर्माण झाल्याने रसवंतीगृह चालविणे जिकरीचे बनले आहे. रसवंतीगृहाच्या यंत्रांची चाके कोरोनामुळे रुतल्याने घर खर्च चालविण्याचा प्रश्न ६० ते ७० टक्के चालकांपुढे निर्माण झाला आहे.

जगणेच मुश्कील होईल...
कदाचित आरोग्याच्या काळजीपोटी पुणेकरांचा यावर्षी प्रतिसाद लाभत नाही. मागील वर्षाच्याच दरात रस विक्री आहे. पुणेकरांनी रसवंतीगृहाकडे पाठ फिरविल्यामुळे फायदा सोडाच घर भाडे व इतर खर्च भागविणे अवघड झाले आहे. गावाला जाताना बहुतेक रिकाम्या होतीच जावे लागणार आहे. पुन्हा लॉकडाउन झाले; तर जगणेच मुश्कील होईल,’’ अशी व्यथा जालन्याहून आईसह शहरात रसविक्री करण्यासाठी आलेल्या किशोर चोथे या तरुणाने मांडली.

परदेशी शीतपेये पिण्यापेक्षा आयुर्वेदिक व आरोग्यासाठी पौष्टिक असणाऱ्या उसाचे रसाचे प्राशन केल्यास उन्हाळ्यात अनेक फायदे होतात. आम्हा ज्येष्ठांसह सर्वांच्या आरोग्यासाठी उसाचा रस महत्त्वाची भूमिका साकारतो. अनेक आजारांवर तो गुणकारी आहे. कोरोनाविषयी काळजी घेत उसाच्या रसाचा आनंद घ्यावा.
- अनुया अशोक बहाडकर, ज्येष्ठ नागरिक

कोरोना काळात उपयुक्त व विविध आजारांवर गुणकारी रस पिण्याकडे सध्या नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे खर्च वजा जाता केवळ २०० ते ३०० रुपये पदरात पडतात. त्यातून मुलांच्या ऑनलाइन शाळेची फी व इतर खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- गणेश फडतरे, नवचैतन्य कानिफनाथ ज्यूस सेंटर

उसाचा रस पिण्याचे फायदे
१. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ऊर्जावर्धक
२. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते
३. अँटिऑक्सिडंटच्या गुणामुळे जंतूशी लढण्यास फायदेशीर
४. पोटॅशिअममुळे पचनक्रिया सुरळीत राहते
५. तजेलदार त्वचेसाठी, तसेच हिरड्यांसाठी उपयुक्त

रसातील घटक
१. कॅल्शिअम,
२. क्रोमिअम,
३. कॉपर
४. मॅग्नेशिअम,
५. फॉस्फरस
६. पोटॅशिअम,
७. झिंक

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT