वडगाव निंबाळकर, ता १२ : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिला हप्ता ३९०० रुपये प्रतिटन प्रमाणे तात्काळ ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केली आहे. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास काटाबंद आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सोमेश्वर कारखाना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाला आहे. आतापर्यंत २ लाख ६० हजार टन एवढे गाळप होऊन साखरेची २ लाख ८५ हजार पोती तयार झाली आहेत. तसेच पुणे व आसपासचे जिल्हे पाहता सर्वांत जास्त रिकव्हरी म्हणजे ११.०४ टक्के सोमेश्वर कारखान्याची आहे. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सर्वच कारखान्यांनी पहिला हप्ता ४५०० रुपये प्रति टन द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु कारखानदार व सरकार या मागणीसाठी प्रतिसाद देत नसल्याने आंदोलन करून पुणे-बंगळोर रस्ता वाहतूक बंद करून साखर कारखाने बंद पाडले होते. त्यावर तोडगा म्हणून सरकार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात चर्चा होऊन पहिला हप्ता ३९०० रुपये देण्यात यावा, असा निर्णय झाला होता.
सोमेश्वर कारखान्याची परिस्थिती चांगली असल्याने नवीन संचालक मंडळाने तात्काळ संचालक मंडळाची बैठक घेऊन ३९०० रुपये प्रतिटन पहिला हप्ता देऊन पुणे जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यांतील कोंडी फोडावी. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांनीही पहिला हप्ता ३९०० रुपये प्रतिटन देण्यात यावा, असे निर्देश संचालक मंडळाला द्यावेत, अशी नम्र विनंती शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.