पुणे

दुरुस्त करून पाठवली आहे

CD

कारखान्यांकडून होणार उसाची ‘पळवा-पळवी’
ऊसतुटवड्याची चाहूल; शेजारच्या पुणे, सातारा जिल्ह्यात दराची स्पर्धा

सुनील राऊत-ः सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. १० ः यंदा सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाल्याने आगामी गळीत हंगामात उसाचे क्षेत्र अन् उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी उसाचे एकरी उत्पादन घटण्याबरोबरच वजनातही घट होणार आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील उपलब्ध उसावर लगतच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांची नजर असून, यंदा ऊस मिळविण्यासाठी मोठी चढाओढ होण्याची शक्यता आहे.

पाऊस नसल्याने चारा म्हणून उसाची तोडणी सुरू आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन तसेच साखरेच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उपलब्ध उसाचा जास्तीत जास्त गाळपासाठी कारखान्यांची लगबग सुरू झाली आहे.
माळेगाव (जि. पुणे) साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अन् संचालकांनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यंदा उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. पहिल्या दिवसापासूनच कार्यक्षेत्राबाहेरील लगतच्या तालुक्यांमधून ऊस आणण्यासाठी तोडणीच्या टोळ्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोट
- मागील वर्षी कारखान्याचा साखर उतारा १२.२८ टक्के होता. एफआरपीपोटी तीन हजार ४६९ रुपये मिळाले आहेत. त्यामध्ये ज्यादा रक्कम करून यंदा पहिला हप्ता ३५०० रुपये दिला जाणार आहे. यंदा १३ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, कार्यक्षेत्राबाहेरील लगतच्या तालुक्यांमधून ऊस आणण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच तोडणीच्या टोळ्या उपलब्ध करून देण्यात येतील.
- अविनाश देवकाते, संचालक, माळेगाव साखर कारखाना

लगतच्या कारखान्यांचीही नजर
माळेगाव साखर कारखान्याप्रमाणेच माळशिरस तालुक्यातील उसासाठी फलटण तालुक्यातील शरयू, स्वराज, श्रीराम, साखरवाडी येथील चार साखर कारखाने, बारामती तालुक्यातील माळेगाव, भवानीनगर, सोमेश्वर तसेच सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे अन् श्रीपूर येथील साखर कारखान्यांचे लक्ष लागले आहे.

मागील हंगामातील गाळप (लाख मे.टनामध्ये)
पुणे जिल्हा ः श्री छत्रपती कारखाना, भवानीनगर - ७.५०, माळेगाव - १०.८९, सोमेश्वर सहकारी - १२.९८, बारामती ॲग्रो १७.५४, नीरा-भीमा, रेडणी- ५.२५.
सोलापूर जिल्हा : सहकार महर्षी, माळशिरस - ७.६८, श्री शंकर,सदाशिवनगर - २.५४, विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर- १५.५४, विठ्ठलराव शिंदे, करकंब- ५.२४, दामाजी, मंगळवेढा -३, पांडुरंग सहकारी, श्रीपूर- ९.४०, ओंकार, चांदापुरी - ५.०२, दि. सासवड माळी शुगर फॅक्टरी- ३.७२.
सातारा जिल्हा : शरयू, कापशी- ६.३२, स्वराज ग्रीन पॉवर, उपळे- ६,
जरंडेश्वर- १९.१५, श्रीराम सहकारी, फलटण- ४.६३, श्री दत्त, साखरवाडी- ८.१०, किसनवीर, भुईंज- ४.५३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sillod News : पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला; भराडीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT