पुणे

‘नीरा-भीमा’ने पहिली उचल ३५०० रुपये जाहीर करावी

CD

बावड, ता. १८ : इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६च्या हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाचे थकीत बिल तातडीने अदा करून प्रतिटन किमान ३३५० रुपये अंतिम ऊसदर निश्चित करावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली असून, चालू गळीत हंगामासाठी किमान ३५०० रुपये पहिली उचल जाहीर करावी, अशी भूमिका समितीने घेतली आहे. याबाबतचे लेखी निवेदन कारखाना प्रशासनाला दिल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी दिली.
यावेळी समितीचे कार्याध्यक्ष महादेव घाडगे यांनी सांगितले की,शेजारील तालुक्यांतील आणि जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा ४०० ते ५०० रुपये अधिक देत गतवर्षीच्या उसाला प्रतिटन ३७०० रुपयांपर्यंत अंतिम दर दिला आहे. नीरा-भीमा कारखान्याची साखर, इथेनॉल आणि अन्य उपपदार्थांच्या माध्यमातून होणारी मिळकत लक्षात घेता शेतकऱ्यांना ३५०० रुपये दर देणे शक्य आहे. मात्र, कारखान्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन समितीने किमान ३३५० रुपये अंतिम दराची न्याय्य मागणी केली आहे.
याबाबत कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकरी संघर्ष समितीला कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा समितीचे सचिव अजित टिळेकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Punjab Lottery Winner : १५ वर्षे कुटुंबापासून लपवून ठेवली 'ती' सवय; अवघ्या ५०० रुपयांच्या तिकिटाने ट्रक चालक एका रात्रीत झाला १२ कोटींचा मालक!

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

Diabetes: डायबेटिस नियंत्रणात आणणं सहज शक्य? संशोधन अहवाल काय सांगतो?

Farmer Compensation Latest News : पाच हजारांच्या मदतीची घोषणा हवेतच, बहुतांश दुष्का ळग्रस्त शेतकरी वंचित; शेतकऱ्यांचा सवाल, पैसे मिळणार कधी?

SCROLL FOR NEXT