ऊसदरासाठी मंगळवारी
किणी टोल नाक्यावर चक्काजाम
राजू शेट्टी यांची घोषणा : ४५०० दराशिवाय तडजोड नाही
कोल्हापूर, ता. ३१ : यंदाच्या गळीत हंगामात प्रतिटन उसाला ४५०० रुपये दर विना कपात मिळावा, यासाठी मंगळवारी (ता. ३) पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी (ता. हातकणंगले) टोल नाक्यांसह सर्व सीमाभागात सकाळी अकरापासून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, ‘‘दीड महिन्यापासून ऊसदर आंदोलन सुरू आहे. यातून केवळ एमएसपी निश्चित करण्याचे काम झाले आहे; मात्र ऊसदराबाबत मुख्यमंत्री आणि शासनाला या आंदोलनाचे गांर्भीर्य नाही. जगात आणि देशात साखरेचा प्रचंड तुटवडा आहे. नवीन साखर निर्मिती केल्याशिवाय साखर उपलब्ध होणार नाही, अशी परिस्थिती आहे. याचाच फायदा घेऊन कारखाने शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राज्यासह कर्नाटकात अनेक आंदोलन झाली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरून वस्तूस्थितीची पाहणी केली. याउलट महाराष्ट्रातील सरकारला गांभीर्य नाही. साखर कारखाने शेतकऱ्यांसाठी पुढे येत नाहीत.’’
ते म्हणाले, ‘‘कारखाने सुरू आहेत, तेथेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते छावण्या टाकूनच तळ ठोकतील.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.