पुणे

ऊस आंदोलनाचा भडका उडणार;

CD

ऊसदरावरून ‘स्वाभिमानी’चा ३ नोव्हेंबरला चक्काजाम

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने जिल्ह्यात ऊस आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. उसाला प्रतिटन पहिली उचल ४५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी ३ नोव्हेंबरला किणी टोलनाक्यावर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे. येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत दिला.
जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत १२.५ टक्क्यांच्या आसपास रिकव्हरी असणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी आम्ही मागणी केली होती. या मागणीवर आम्ही ठाम आहोत. मात्र, कारखानदार ३५०० रुपये आणि ३,६०० रुपये दर देण्याचे म्हणत असतील, तर उसाचे एक कांडेही तोडू देणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी म्हणाले, की कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिटन ३४५० ते ३६५० रुपयांच्या आसपास सर्वांची एफआरपी बसते. हे आम्हाला मान्य नाही. गेल्या वर्षी एफआरपी अधिक १०० रुपये दर घेतला. त्यावेळी साखरेचा दर प्रतिक्विंटल ३७०० रुपये गृहीत धरला होता. मात्र, गेल्या वर्षी प्रत्यक्षात साखरेचा दर प्रतिकिलो ४० रुपये म्हणजे प्रतिक्विंटल ४ हजारांवर गेला. यामुळे कारखान्यांना ३०० रुपये अधिक मिळाले. त्यांनी ते ३०० रुपये द्यायला हवे होते, असे शेट्टी म्हणाले.
दरावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या दोन बैठका झाल्या. मात्र, या दोन्ही बैठकांमध्ये कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. चर्चेतून मार्ग निघत नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका स्वाभिमानीने घेतली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कर्नाटकातील शेतकऱ्यांना २४ तास वेळ देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत; पण आपल्या मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळच नाही, असा आरोप शेट्टी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 5th T20I: शेवटचा सामन्यात होणार मोठे प्रयोग? वैभव सूर्यवंशी, कुलदीपला मिळणार Playing XI मध्ये संधी?

Marathi News Live Updates : गोकुळ दूध संघातर्फे उत्पादकांना ११७ कोटींची 'दिवाळी भेट'; अंतिम दूध दर फरक थेट बँक खात्यात जमा

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Foreign Deputy PM daughter Bollywood Ambition : "ते नेते माझ्या मागेच लागलेत!"; जगातील 'त्या' बलाढ्य देशाच्या उपपंतप्रधानांच्या मुलीला काम करायचंय बॉलिवूडमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा खुलासा

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

SCROLL FOR NEXT