पुणे

निश्चित केलेला दर न देणारा कारखान्याविरोधात आंदोलन

CD

MGV26B16492
मंगळवेढा : येथे ऊसदर समितीच्या बैठकीत सहभागी झालेले शेतकरी बांधव.

निश्चित केलेला दर न देणाऱ्या कारखान्यांविरुद्ध आंदोलन
मंगळवेढा येथे ऊसदर समितीच्या बैठकीत निर्णय; दुसरा हप्ता २०० रुपये द्यावा

मंगळवेढा, ता. ३१ : तालुक्यात ज्या कारखान्यांनी निश्चित केलेला ऊसदर देण्याचे लेखी आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे दर दिलेला नाही, त्या कारखान्यांविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय ऊसदर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस ऊसदर संघर्ष समितीचे दीपक भोसले, सचिन पाटील, ॲड. राहुल घुले, निवास नागणे, श्रीमंत केदार, संगमेश केदार, बाळासाहेब बोबडे, संदीप फडतरे, पांडुरंग बाबर यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
मागील वर्षीच्या ऊसदर आंदोलनावेळी मंगळवेढा तालुक्यातील दामाजी, युटोपियन, भैरवनाथ आणि फॅबटेक या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन ३,००० रुपये ऊसदर देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार संबंधित कारखान्यांनी संपूर्ण दर दिला आहे का, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. आगामी पोळा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवरही बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांची पिके व जनावरांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात सोडावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. ऊसदर, थकीत ऊस बिले, आगामी गाळप हंगामातील पहिली उचल, दुष्काळी परिस्थिती व पाण्याच्या प्रश्नावर ऊसदर संघर्ष समिती यापुढेही आक्रमक भूमिका घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

चौकट...
अन्यथा उसाला कोयता लावू नये
येत्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यापूर्वी उसाची पहिली उचल जाहीर करावी, असे आवाहन समितीने केले. पहिली उचल जाहीर होईपर्यंत कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याने उसाला कोयता लावू नये, असा ठरावही करण्यात आला. शेतकऱ्यांनी एकजुटीने हा निर्णय अंमलात आणावा, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Tukaram Mundhe: ‘हे तर आमचे पाळीव आहेत!’ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डझनभर उंदीर, मॅनेजरचा भन्नाट बहाणा; तुकाराम मुंढेनी सांगितला किस्सा

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

SCROLL FOR NEXT