पुणे

ऊस दराबाबत पिलीव येथे शेतकरी आक्रमक- सदगुरू कारखान्याकडे जाणारी ऊसाची वाहतूक रोखली

CD

PIL26B00931
पिलीव (ता. माळशिरस) : येथे ऊसदराबाबत शेतकरी आक्रमक झाले. राजेवाडी येथील सद्‌गुरु श्री श्री साखर कारखान्याकडे जाणारी उसाची वाहतूक अडवली.

‘सद्‌गुरू’कडे जाणारी ऊस वाहतूक रोखली
पिलीवमध्ये शेतकरी आक्रमक; सांगलीप्रमाणे दर देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
पिलीव, ता. १८ : ऊसदराच्या मागणीसाठी पिलीव येथे शेतकरी आक्रमक झाले. सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील राजेवाडी (जि. सांगली) येथील सद्‌गुरू श्री श्री साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक शेतकऱ्यांनी आज (ता. १८) पिलीव-पंढरपूर मार्गावर रोखली.
ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्याचा आदेश सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र, राजेवाडी येथील सद्‌गुरू कारखाना सांगली जिल्ह्यात असल्याने त्या जिल्ह्याप्रमाणे ऊसदर द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच, मागील वर्षी प्रतिटन १०० रुपये कमी दिले असून, ही रक्कमही द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनामुळे पिलीव-पंढरपूर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
या आंदोलनात शिवप्रसाद पुकळे, महावीर धायगुडे, जितेंद्र पाटील, अज्ञान मदने, अर्जुन वाघ, अशोक घोंगडे, भीमराव कपणे, विठ्ठल मदने, नबाजी मदने, मनोहर लवटे, अंकुश देवकते, संजय पाटील, धनाजी मदने, विजय मदने, अंकुश मदने यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकरी शिवप्रसाद पुकळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडे सद्‌गुरू कारखान्याबाबत कैफियत मांडली. त्यावर, सद्‌गुरू कारखान्याने सांगली जिल्ह्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊसदर द्यावा, असे शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप-शिवसेना कार्यालयांवर म्हाडाचा हातोडा; कारवाईवरून पदाधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

Instagram Algorithm Update India : इन्स्टाग्रामवर आता अश्लील आणि हिंसक कंटेंट दिसणार नाही? मेटाचा भारतात मोठा निर्णय

Panchganga Sugar Factory : पंचगंगा शुगरकडून ३३०० रुपयांची पहिली उचल घोषित; टप्प्याटप्प्याने ३५०० रुपयांपर्यंत भाव देणार; इतर कारखानदारांनी भूमिका न घेतल्याने शेतकरी आक्रमक

Latest Marathi News Live Update : वाघोली परिसरात चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात नववा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT